एक्स्प्लोर

Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार

Smriti Irani Slams Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी पुकारलेल्या आंदोलनावर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (SIR) कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुकारलेल्या आंदोलनावर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे.

जी व्यक्ती अमेठीमधून स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवू शकत नाही, तीच व्यक्ती आज दिल्लीतील 14 राजकीय पक्षांशी संपर्क साधून देशाचा बादशहा बनण्याची आळवणी करत आहे. आपली लोकशाही व्यवस्था, संविधान आणि निवडणूक आयोग यांच्याविरोधातील असा उद्धटपणा देश कधीही सहन करणार नाही, अशा शब्दात स्मृती इराणी यांनी टीका केली. 

Rahul Gandhi Protests Against CEC : 12 ऑक्टोबरचे आंदोलन आणि राहुल गांधींचे थेट आरोप

मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणातील कथित घोळ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया' (INDIA) आघाडीने 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील बारखंबा रोड ते सुप्रीम कोर्टापर्यंत मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात राहुल गांधी यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

या आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना शिक्षा मिळणारच. इथे कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणाची विशेष जात नाही, कोणी महिला किंवा पुरुष नाही. इथे एकच आवाज आणि एकच विरोध आहे. हा संपूर्ण भारताचा आवाज असून तुम्ही या आवाजाविरोधात उभे आहात", असा थेट इशारा राहुल गांधी यांनी दिला होता.

दुसऱ्या बाजूला, समाजवादी पक्षाचे तीन बंडखोर आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी 'सपा'वरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, "आज यूपीतील तीन प्रमुख नेते आमच्या पक्षात सामील झाले आहेत. समाजवादी पक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीतही पराभूत झाला होता. त्यांना स्वप्ने पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र भाजपचेच सरकार पुन्हा स्थापन होणार हीच कडू सत्य परिस्थिती आहे."

उत्तर प्रदेशातील जनता सपाच्या काळातील कुशासन कधीही विसरणार नाही, असे सांगत स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, "सपाच्या राजवटीचा अर्थ देशाचा व राज्याचा विकास रोखणे असा होता. आज उत्तर प्रदेशातील तब्बल 5.94 कोटी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरिबीतून बाहेर काढले आहे."

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naigaon : नायगाव रेल्वे स्थानक प्रकरणातील पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget