RRB NTPC Exam Suspended: रेल्वेची RRB-NTPC आणि RRBच्या परीक्षेला स्थगिती, विद्यार्थ्यांचे सुरू होते आंदोलन
RRB NTPC Exam Suspended: परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने RRB NTPC परीक्षेला स्थगिती दिली आहे.
RRB NTPC Exam Suspended: रेल्वे मंत्रालयाने RRB-NTPC आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1 ची भरती परीक्षेवर स्थगिती दिली आहे. भरती परीक्षेच्या निकालानंतर नाराज असलेल्या परीक्षार्थींच्या तक्रारींच्या सुनावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या निकालावर नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला होता.
RRB-NTPC विभागाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी याविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले होते. बिहारमध्ये दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलनही केले होते. त्याशिवाय काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवरही ताबा मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला. रेल्वेने जाहीर केलेल्या निकालात घोळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
मंगळवारी सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण बिहारमधील इतर भागांमध्येही पसरले. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. RRB-NTPC च्या परीक्षेचा निकाल 14-15 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
रेल्वे भरतीसाठी अपात्र ठरवण्याचा इशारा
बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने आंदोलक विद्यार्थ्यांना भविष्यातील रेल्वेतील नोकरीसाठी अपात्र ठरवण्याचा इशारा दिला होता. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या कारवाईच्या धमकीनंतरही आंदोलन सुरू होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- आनंदवार्ता! सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा, आजपासून नोंदणी सुरू
- पुण्यातील शाळांबाबत पुढील 7 दिवसांमध्ये निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
- Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिन साजरा करताय, मग संविधानाचे महत्त्व सांगणारी ही खास मालिका पाहाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI