(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Robert Vadra Corona Positive : रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह, प्रियांका गांधींचा आसाम-तमिळनाडू आणि केरळ दौरा रद्द
रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियंका गांधी यांनीही कोरोना चाचणी केली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी सांगितलं की, "रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केला आहे. मी आता आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
Robert Vadra Corona Positive : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांनीही कोरोना चाचणी केली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी सांगितलं की, "रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केला आहे. मी आता आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
प्रियंकाचा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द
प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत सांगितलं की, "काही दिवसांपूर्वी कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे मी माझा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द केला आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी पुढील काही दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार आहे. असुविधेसाठी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते."
दरम्यान, आसाममध्ये प्रियंका गांधी यांच्या आज तीन सभा घेणार होत्या. प्रियंका दुपारी 12 वाजता गोलपारा पूर्वमध्ये, दुपारी दीड वाजता गोलकगंजमध्ये आणि दुपारी साडेतीन वाजता सरुखेत्रीमध्ये सभा घेणार होत्या.
येत्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
देशात कोरोनाच्या संक्रमणाचा वेग सातत्याने वाढत असून गेल्या देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात येत्या 15 ते 20 दिवसात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणं नोंद केली आहेत. त्यात वरील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही येत्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचं मतही मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केलं आहे. मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, येत्या 15 ते 20 दिवसात रोज 80 हजार ते 90 हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :