एक्स्प्लोर
रॉबर्ट वाड्रांची 6 तास कसून चौकशी, ईडीने 36 प्रश्न विचारले
रॉबर्ट वाड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. तसंच डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे. वाड्रा यांनी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : मनी लॉड्रिंगप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांची अमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं 6 तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान वाड्रा यांना 36 प्रश्न ईडीकडून विचारण्यात आले. सोबतच वाड्रांना ईमेल आणि कागदपत्रांची विचारणा केली गेली तसेच अनेक व्यक्तींची नावं घेण्यात आली. वाड्रांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आरोप फेटाळून लावले. लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. तसंच डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे. वाड्रा यांनी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. वाड्रा यांनी आर्म्स डिलर संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ सुमीत चढ्ढा यांच्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचं सांगितलं. यासोबतच लंडनमधील संपत्तीत आपला सहभाग नसल्याचाही दावा केला. वाड्रा यांनी यावेळी आपण मनोज अरोराला ओळखत असल्याचं सांगितलं. मनोज अरोरा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा माजी कर्मचारी आहे. वड्रा यांच्याशी संबंधित या कंपनीने 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 3.5 एकर जमीन 7.50 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन 58 कोटी रुपयांना विकली आणि 509 कोटी रुपये नफा कमाविला, अशी नोंद एफआयआरमध्ये आहे. आपण मनोज अरोराला ओळखत असलो तरी त्याने आपल्यासाठी काही ई-मेल लिहिले नसल्याचं रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलं. दरम्यान रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रियांका गांधीदेखील सोबत आल्या होत्या. वाड्रा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता. काय आहे प्रकरण ? शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले होते. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विदेशात जमवलेल्या संपत्तीच्या चौकशी संबंधित होती. त्याचबरोबर सुरक्षा सामग्रीच्या खरेदीत काही संशयिताना दलाली मिळाल्याच्या चौकशीबाबत ही झडती घेतली गेली. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल्ली, नोएडा, सुखदेव विहार आणि जयपूर या परिसरात ही छापेमारी करण्यात आली होती. कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. कायदा आणि घटनेचा अवमान करत ईडीने वाड्रा यांच्यावर ही कारवाई केली असल्याच्या आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला होता.Delhi: Robert Vadra leaves from the Enforcement Directorate office after questioning in connection with a money laundering case. pic.twitter.com/FtSidnpGJ8
— ANI (@ANI) February 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement