एक्स्प्लोर
देशात तब्बल 65 हजार कोटींचा काळा पैसा, मुंबई दुसऱ्या नंबरवर
![देशात तब्बल 65 हजार कोटींचा काळा पैसा, मुंबई दुसऱ्या नंबरवर Roadsideeateryowners Declare Rs 65 Crore Under Black Money Scheme In Mumbai देशात तब्बल 65 हजार कोटींचा काळा पैसा, मुंबई दुसऱ्या नंबरवर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08100113/Black-money-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: मोदी सरकारानं देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेल्या उप्तन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत आली असताना आत्तापर्यंत 65 हजार कोटी काळा पैसा जमा झाला.
आयकर विभागाच्या देशातील कार्यालयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी झुंबड उडाल्याचं दिसून आलं. यामध्ये 40 ते 50 हजार कोटी रुपयांपर्यंतचा काळा पैसा जमा होईल, असा अंदाज आहे. आत्तापर्यंत जमा झालेल्या 65 हजार कोटींच्या उप्तन्नावर सरकारला 30 कोटींचा कर मिळेल.
काळा पैसा घोषित करण्याच्या यादीत हैदराबाद पहिल्या तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आढळून आले. हैदराबादेतून 13 हजार कोटी तर मुंबईतून 8 हजार 500 कोटी उप्तन्न घोषित झालंय.
आयकर विभागाने घाटकोपरचे साई स्वाद डोसावाले या दुकानावर छापा टाकला होता. खाऊगल्लीतल्या त्यांच्या गाड्यावर जमणारी गर्दी आयकर अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर आल्याने त्यांनी आठ दिवस रेड्डींच्या गाड्यावर पाळत ठेऊन नवव्या दिवशी विजय रेड्डींवर धाड टाकली. आयकर विभागाने धाड टाकली, तेव्हा त्यांच्या गल्ल्यात 60 हजार रुपयेच मिळाले. मात्र, त्यातील काही पैसे मित्रांचे असल्याचा दावा रेड्डींनी केला.
संबंधित बातम्या
काळा पैसा जाहीर करण्यासाठी आज शेवटचा दिवस
मुंबईतील डोसेवाल्यावर आयकर विभागाचा छापा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)