Lalu Yadav Health Updates: लालू यादव यांची प्रकृती अचानक बिघडली, अनेक वरिष्ठ डॉक्टर रिम्समध्ये दाखल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालू यादव यांना छातीत संसर्ग आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागली आहेत.
![Lalu Yadav Health Updates: लालू यादव यांची प्रकृती अचानक बिघडली, अनेक वरिष्ठ डॉक्टर रिम्समध्ये दाखल RJD supremo Lalu Yadavs health deteriorated suddenly, all senior doctors rushed rims Lalu Yadav Health Updates: लालू यादव यांची प्रकृती अचानक बिघडली, अनेक वरिष्ठ डॉक्टर रिम्समध्ये दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22034813/lalu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रांची : झारखंडची राजधानी रांची येथून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी सायंकाळी रांची रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये दाखल झालेल्या आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला, त्यानंतर लगेचच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना कळविण्यात आले.
आरोग्यमंत्रीही रिम्समध्ये पोहोचले माहिती मिळताच सर्व डॉक्टर अननफानन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि लालू यादव यांच्या उपचारात गुंतले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालू यादव यांना छातीत संसर्ग आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागली आहेत. पण, यासंदर्भात कोणीही काही बोलायला तयार नाही. येथे डॉक्टरांसह रिम्सचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप, तुरूंगातील आयजी बीरेंद्र भूषण आणि झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ताही रिम्समध्ये पोहोचले आहेत.
मूत्रपिंड केवळ 25 टक्के कार्यरत
महत्त्वाचे म्हणजे चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी सुप्रीमो लालू यादव दोषी आहेत. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे रिम्स पेइंग वॉर्डमध्ये दाखल आहेत. नुकतीच लालू प्रसाद यादव यांच्या डॉक्टरांनी त्यांची तब्येत खूपच खालावली असल्याचे सांगितले होते. त्यांचे मूत्रपिंड केवळ 25 टक्के कार्यरत आहे आणि कधीही बिघडू शकते. त्याचवेळी, साखरेमुळे त्यांच्या अवयवांचे नुकसान होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)