एक्स्प्लोर
VIDEO : विराट कोहलीकडून ऑलिम्पिकपटूंना आगळंवेगळं प्रोत्साहन

मुंबई : रिओ ऑलिम्पिक 2016 साठी 119 खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे. या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका स्पोर्ट्स ड्रिंकच्या जाहिरातीमध्ये विराटने सर्व ऑलिम्पिकपटूंना प्रोत्साहन दिलं आहे. रिओमध्ये भारताची मान उंचावण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. ज्या देशात क्रिकेट कोट्यवधी लोकांच्या रक्तात धावत आहे, त्याच देशात काही खेळाडू असेही आहेत ज्यांच्या जिद्दीला तोड नाही, असं विराटने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























