एक्स्प्लोर
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल पायउतार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे पटेल यांनी सांगितले. रघुराम राजन यांच्यानंतर पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती.
वैयक्तिक कारणांमुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन तात्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी विविध भूमिका बजावणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया उर्जित पटेल यांनी दिली.
रघुराम राजन यांच्या राजीनाम्यानंतर 5 सप्टेंबर 2016 रोजी उर्जित पटेल यांनी आरबीआयची सूत्रे स्वीकारली होती. राजन गव्हर्नर होते, त्यावेळी उपगव्हर्नपदाची जबाबदारी उर्जित पटेल यांच्याकडे होती. 14 जानेवारी 2013 पासून ते उपगव्हर्नर म्हणून कार्यरत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement