Republic Day : आजपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ; जाणून घ्या, कसा असेल संपूर्ण कार्यक्रम?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यापुढे 23 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Republic Day : तीन दिवसांवर आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. यंदा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये भारत सरकारने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. याशिवाय आता हा सोहळा आजपासून 30 जानेवारीपर्यंत आयोजित केला जाणार असून मुख्य सोहळा 26 जानेवारीला होणार आहे. त्याबरोबर कार्यक्रमातील फ्लायपास्ट 10 ऐवजी 10.30 वाजता सुरू होणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यापुढे 23 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 23 जानेवारीला सुरू झालेला हा उत्सव 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 30 जानेवारी रोजी शहीद दिन आहे. या दिवशी सोहळ्याची सांगता होणार आहे. दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुमारे 1 हजार ड्रोन, 75 लष्करी विमाने, 12 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये सहभागी होणार आहेत.
दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी 25 हजार प्रेषकांना परवानगी देण्यात आली होती. या वर्षी ही संख्या 5 ते 8 हजारांच्या दरम्यान कमी झाली आहे.
दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल ड्रेस रिहर्सल आहे. ही संपूर्ण परेड 26 जानेवारी रोजी सर्वांना पाहता येणार आहे. सैन्याच्या मार्चिंग तुकड्या, रणगाडे, तोफगोळे आणि बँड या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
- महत्वाच्या बातम्या
- Subhash Chandra Bose : सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात 'नेताजीं'चा मोलाचा वाटा
- Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद
- Digital India : सर्व सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल प्रोफाईल, ऑगस्टपासून सुरू होणार ‘सिंगल साईन ऑन’ पोर्टल