Republic Day 2021 Stickers GIF | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी असे डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp Stickers, GIF
नव्या गोपनीयता धोरणामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि चर्चेत आलेल्या WhatsApp वर या खास दिवसाचे स्टीकर्स आणि जीफ इमेजेसचा पाऊस पडत आहे.
Republic Day 2021 देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. शासकीय स्तरावरून आणि व्हर्च्युअल वर्तुळातूनही सध्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिथं नव्या गोपनीयता धोरणामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि चर्चेत आलेल्या WhatsApp वरही या खास दिवसाचे स्टीकर्स आणि जीफ इमेजेसचा पाऊस पडत आहे. तुम्हीही संपर्क यादीमध्ये असणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींना आणि इतरांनाही या दिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर, तुम्हाला थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे.
WhatsAppच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day stickers) स्टीकर्स कसे डाऊनलोड आणि शेअर कराल?
- तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल तर, गुगल प्लेस्टोअरवर जाऊन Republic Day Stickers for WhatsApp असं टाईप करा.
- तुम्हाला इथं अनेक पर्याय देण्यात येणार आहेत. Anques Technolabs च्या माध्यमातूनही तुम्ही हे स्टीकर डाऊनलोड करु शकतात.
- स्टीकरसाठीचं अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक स्टीकर दिसतील. इथं तुमच्या प्राधान्यानुसार स्टीकरसमोरील ‘+’ आयकॉन दाबत तुम्ही स्टीकर निवडू शकता.
- स्टीकर अॅड केल्यानंतर ते स्टीकर्स व्हॉट्सअप मध्ये स्माईलीच्या आयकॉनवर गेलं असता तिथं दिसतात.
Republic Day GIFs कशा पद्धतीनं पाठवाल?
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून Republic Day GIFs जीफ इमेज पाठवण्यासाठी इमोजीच्या आयकॉन शेजारीच तुम्हाला जीफ असा पर्याय दिसेल. तो निवडून तिथं येणाऱ्या सर्च बारमध्ये तुम्हाला जे जीफ हवं आहे, उदाहरणार्थ Republic Day असं टाईप केलं असता अवघ्या काही क्षणांतच तुम्हाला समोर काही पर्याय येतील. यातून तुम्ही हवं ते जीफ निवडून अपेक्षित व्यक्तीला पाठवू शकता.
तुम्हाला जीफचे अधिक पर्याय हवे असल्यास Giphy.com या वेबसाईटवर जाऊन यामध्ये ‘HTML5’ व्हिडीओ लिंक व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला पाठवायची आहे त्यांच्या चॅटबॉक्समध्ये कॉपी- पेस्ट करावी.