एक्स्प्लोर
सर्व डाळींवरची साठवणूक मर्यादा हटवली, केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली: सर्व डाळींवरच्या साठवणुकीच्या मर्यादा हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रानं सर्व राज्य सरकारलाही यासंबंधी सूचना दिल्या आहेत. मात्र, साठवणूक निर्बंध मर्यादा हटवल्यानं डाळीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
साठवणूक मर्यादेमुळे आतापर्यंत फक्त छोटे व्यापारीच डाळ खरेदी करु शकत होते. पण आता या निर्णयामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यां हजारो टन डाळ खरेदीचा व्यवहार करु शकतात. त्यामुळे तूर डाळींच दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाची माहिती ट्विटरवरुन दिली. ‘देशात मोठ्या प्रमाणात डाळींचं उत्पादन झालं असून सध्या डाळींना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डाळींच्या साठवणुकीवर लावण्यात आलेली मर्यादा तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच सर्व राज्यांनाही त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं पासवान यांनी स्पष्ट केलं.
देश मे दालो की पर्याप्त उपलब्धता एंव कीमतो मे गिरावट को देखते हुए दालो पर लगाई गई स्टॉक लिमिट को तत्काल प्रभाव से हटाने का निर्देश दिया है
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) May 16, 2017
दाल उत्पादक किसानों के हितों को देखते हुए राज्यों को सभी दालों पर से स्टॉक लिमिट हटाने का निर्देश दिया गया है। — Ram Vilas Paswan (@irvpaswan) May 16, 2017दरम्यान, राज्यातली अजून १० लाख क्विंटल तूर खरेदीबाबत केंद्र सरकारकडे मागणी करु, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. सध्या ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याची मुदत आहे. मधल्या काळात २ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे नाफेडनं बंद केलेली तूरखरेदी पुन्हा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात काही महिन्यांपूर्वीच डाळींच्या साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ करण्यात आली होती. या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात साठा मर्यादा घाऊकसाठी 3,500 क्विं. वरुन 10,500 तर किरकोळसाठी 200 वरून 600 क्विंटल तसेच अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊकसाठी 2,500 क्विं. वरून 7,500 तर किरकोळसाठी 150 वरुन 450 क्विं. आणि इतर ठिकाणी घाऊकसाठी 1,500 वरुन 4,500 क्विं तर किरकोळसाठी 150 वरून 450 क्विंटल इतकी वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या हंगामात तुरी उत्पादन कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवला होता. त्यावेळी राज्य शासनाने तूर उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर तूर डाळींचे उत्पादन झाले आहे. मात्र, आता डाळ साठवणुकीवरील मर्यादा हटवल्यानं डाळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित बातम्या: शेतकऱ्यांच्या हितासाठी डाळींच्या साठवणूक मर्यादेत तीपटीने वाढ : गिरीश बापट मंत्रालयाच्या गेटवर डाळ-कांदा फेकला डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान 'पीकेव्ही मिनी दालमिल' जात्यावरच तुरीची डाळ तयार, जालन्यातील महिलांचा प्रयोग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement