एक्स्प्लोर
तब्बल 18 वर्षानंतर लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या प्रमुख आरोपी अटकेत
दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन काल (बुधवार) दहशतवादी बिलाल अहमदला अटक करण्यात आली आहे. बिलाल हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलीस आणि गुजरात एटीएसच्या टीमला मोठं यश मिळालं आहे. दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन काल (बुधवार) दहशतवादी बिलाल अहमदला अटक करण्यात आली आहे. बिलाल हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे.
22 डिसेंबर 2000 साली लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट मोस्ट वॉण्टेड दहशतवादी बिलाल अहमद कावानं रचला होता. काल बिलाल श्रीनगरहून दिल्लीला येत असल्याची गुप्त माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ दिल्ली पोलिसांना देत संयुक्तपणे एक ऑपरेशन लाँच केलं आणि बिलालला दिल्ली विमानतळावरुन अटक केली.
22 डिसेंबर 2000 साली लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील दुसरा प्रमुख आरोपी आरिफला कोर्टानं फाशी शिक्षा दिली आहे. तर याप्रकरणी 11 दोषींना देखील कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. पण या हल्ल्यानंतर बिलाल काश्मीरमध्ये लपून राहिला होता. दरम्यान, 26 जानेवारीच्या बरोबर 16 दिवस आधी दहशतवादी बिलाल अटक केल्यानं दिल्ली आणि गुजरात पोलिसांचं हे मोठ यश मानलं जात आहे. सध्या दिल्ली पोलिसांचं विशेष पथक त्याची चौकशी करत आहे.Photo of suspected LeT terrorist Bilal Ahmed Kawa arrested in a joint operation by Special Cell of Delhi Police and Gujarat ATS from Delhi Airport for alleged involvement in terror attack on Red Fort in the year 2000. pic.twitter.com/PIDTAchwBI
— ANI (@ANI) January 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement