एक्स्प्लोर
मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे आजपासून कायमचे हद्दपार!
मुंबई: मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवा आजपासून इतिहासजमा होणार आहेत. केंद्र सकरानं व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी गाडीवर लाल दिवा न लावण्याचा निर्णय घेतला, त्याची अमंलबजावणी आजपासून केली जाणार आहे.
मोदी सरकारानं हा निर्णय घेताच काही मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून ठेवला होता. पण आता कोणत्याही मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला लाल दिवा नसणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांकरीता निळा दिवा वापला जाईल. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त निळा दिवा वापरण्यात येईल.
21 एप्रिल रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिवे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे आता आजपासून राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री किंवा राज्यातले मंत्री यांना लाल दिव्याच्या गाड्या वापरता येणार नाहीत.
यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या गाड्यांना निळा दिवा असणार आहे. लाल दिव्याबाबत असणारी 108 नंबरची तरतूद काढण्यात आली आहे.
बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणारा रेरा कायदाही आजपासून लागू:
तर दुसरीकडे बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या रेरा म्हणजेच रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टची आजपासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे.
या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या हितासाठी अनेक तरतुदींचा समावेश रेरा कायद्यात करण्यात आला आहे.
केंद्रानं 25 मार्च 2016ला रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट कायदा मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील रेरा कायदा मंजूर करण्याचं निश्चित केलं. त्यासाठी जनतेनं दिलेल्या 750 सूचनांचाही विचार करण्यात आला.
संबंधित बातम्या:
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा कायमचा बंद!
देशातील फक्त 9 पदांनाच लाल दिवा द्या, गडकरींचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement