एक्स्प्लोर
स्टेट बँकेत तब्बल 2,313 जागांसाठी मेगा भरती!
मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने मेगा भरती सुरु केली आहे. प्रोबेशन ऑफिसर या पदासाठी तब्बल 2,313 जागा भरण्यात येणार आहेत.
एसबीआयने त्याबाबतचं नोटीफिकेशनही (CRPD/PO/2016-17/19) जारी केलं आहे. स्टेट बँकेच्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये हे नोटीफिकेशन पाहता येईल.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षा, मुलाखत अशा विविध चाचण्यांमधून उमेदवारांची निवड केली जाईल.
या जागांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. 6 मार्च 2017 पर्यंत ही प्रक्रिया सुरु असेल.
पात्रता
- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावेत.
- सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. मात्र मुलाखतीदरम्यान म्हणजेच 1 जुलै 2017 पूर्वी त्यांनी पदवी परीक्षा पास झाल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
- चार्टर्ड अकाऊंटण्ट्सही या पदासाठी अर्ज करु शकतात.
- अर्जदार उमेदवार हा 21 वर्षाखालील नसावा. उमेदवाराचं वय 21 ते 30 दरम्यान असावं.
- उमेदवाराने 1 एप्रिल 2017 पर्यंत 30 वर्ष पूर्ण केलेले नसावं.
- म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1987 पूर्वीचा आणि 1 एप्रिल 1996 नंतरचा नसावा.
- SC, ST, OBC, PWD या कोट्यासाठी वयाच्या मर्यादेत सूट देण्यात आली आहे.
- ऑनलाईन प्रिलिमनरी अर्थात प्राथमिक परीक्षा 29 आणि 30 एप्रिल, 6 आणि 7 मे 2017 रोजी होतील.
- प्राथमिक परीक्षेचा निकाल 17 मे 2017 रोजी जाहीर होईल.
- यानंतर ऑनलाईन मुख्य परीक्षा 4 जून 2017 रोजी होईल.
- या परीक्षेचा निकाल 19 जून 2017 ला जाहीर होईल.
- ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत 10 जुलै 2017 रोजी होईल.
- मग याचा निकाल 5 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement