एक्स्प्लोर

अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येतेय, गुंतवणुकीसाठी भारत सर्वात आवडतं स्थान बनेल : पंतप्रधान

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

नवी दिल्ली : "देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो," असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. "भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनेल," असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोनाव्हायरसविरुद्धची सरकारची लढाई, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जोर दिला. "चीनचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, कोरोनाव्हायरसच्या महामारीनंतर जगभरात भारत उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवस्थेत अग्रगण्य देशांमध्ये सहभागी होईल. इतर देशांना झालेल्या नुकसानीचा फायदा घेणं यावर भारताचा विश्वास नाही. परंतु भारत आपल्या लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुरवठ्यातून हे स्थान मिळवेल," असं मोदी म्हणाले.

अर्थव्यवस्था सावरत आहे : नरेंद्र मोदी सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेविषयी समाधान व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, "अर्थव्यवस्थेचे सर्व निकष हेच दर्शवतात की, भारत रिकव्हरीच्या मार्गावर आहे. कृषी, परदेशी गुंतवणूक, उत्पादनात वेग, गाड्यांच्या विक्रीत वाढ ही उदारहणं पाहा. ईपीएफओमध्ये जास्तीत जास्त लोकांची गुंतवणूक हेच दर्शवते की, नोकऱ्यांमध्ये तेजी आली आहे." "गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाढ ही विकासाची प्रेरणा असेल. आमची सुधारणावादी पावलं हे सुनिश्चित करतील की गुंतवणुकीसाठी भारत सर्वात महत्वाचे स्थान बनेल," असंही नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं.

कृषी कायदे, कोरोना, आपत्तीबाबत मोदी काय म्हणाले? कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "अनेक तज्ज्ञांनी या दुरुस्तीची बराच काळ पाठराखण केली आहे. याचं श्रेय आम्हाला मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा आहे." नव्या मदत पॅकेजसंदर्भात मोदी म्हणाले की, "अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी सर्व पावलं वेळोवेळी उचलली जातील याकडे आमचं लक्ष असेल." कोरोनावरुन विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत मोदी म्हणाले की, "मार्च महिन्यात जी शंका उपस्थित केली होती, त्यानंतर तुम्ही सध्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहा." "आपत्तीपीडित लोकांसाठी तातडीने मदतीची पावलं उचलण्यात आहे. तर याआधीच्या आपत्तींमध्ये भ्रष्टाचारामुळे गरिबांना वेळेवर दिलासा मिळत नसे," असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

जीएसटी परतावा राज्यांच्या जीएसटी परताव्याबाबत मोदी म्हणाले की, "राज्य सरकारांप्रती आमचं सरकारत संवेदनशील नाही, हे म्हणणं चुकीचं असेल. यूपीए सरकारच्या काळात वॅट आला होता तेव्हा त्यांनी राज्यांना महसुलाच्या नुकसानभरपाईचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण झालं नाही. त्यांनी सलग पाच वर्षांपूर्वी राज्यांच्या नुकसानीची भरपाई केली नव्हती."

RBI Monetary Policy | कोरोना संकटातून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली : गव्हर्नर शक्तिकांत दास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania VS Dhananjay Munde : कोट्यवधींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याABP Majha Headlines : 05 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDhananjay Munde: सरकारने दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या?आरोपांवरुन संतापले, म्हणाले..Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Embed widget