एक्स्प्लोर
Advertisement
पैसे घरात साठवण्यावरही आता मर्यादा, मोदी सरकारची तयारी
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी पैसे साठवण्यावर, बाळगण्यावर किंवा घरात ठेवण्यावर सरकार मर्यादा घालणार असल्याची माहिती आहे.
नोटाबंदी झाल्यानंतरही नव्या नोटांचे साठे सापडत असल्यानं सरकारनं हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. मोदी सरकारने काळ्या पैशाबाबत नेमलेल्या विशेष चौकशी समितीनं सर्वोच्च न्यायालयात आपला पाचवा अहवाल मांडला. या अहवालात एका घरात 15 लाखांहून अधिक रक्कम जमा करता येऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे.
इतकंच नाही, तर देवाणघेवाणीसाठी फक्त 3 लाखांची मर्यादा घालण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांवर सरकार गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement