एक्स्प्लोर
बनावट नोटांची ओळख पटविण्यासाठी बीएसएफ जवानांना रिझर्व बँकेचं प्रशिक्षण!
मुंबई : बांगलादेश सीमेवर तैनात बीएसएफ जवानांना बनावट नोटा ओळखण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची विनंती रिझर्व बँकेकडे करण्यात आलीय. पाकिस्तानातून बांगलादेश मार्गे दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात भारतात येत आहेत. अलीकडेच तीन ते चार वेळा भारतात अशा नोटा धाडल्या जात असताना बीएसएफ जवानांनी पकडल्या आहेत.
बीएसएफ जवान सीमेपलिकडून तस्करी होत असलेल्या नोटा पकडतात तेव्हा त्यांना भारतीय चलनातील नोटांची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व बँकेशी वारंवार संपर्क साधावा लागतो. या प्रक्रियेसाठी बराच अवधी लागत असल्यामुळे बीएसएफ जवानांना बनावट आणि खऱ्या नोटा ओळखण्याचं प्रशिक्षण देण्यात यावं अशी विनंती बीएसएफमार्फत आरबीआयला करण्यात आलीय.
दोन हजार रूपयांच्या नव्या नोटेत तब्बल 17 सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्याची पडताळणी कशी करायची याची पुरेशी माहिती जवानांना असणं गरजेचं आहे. बांगलादेश सीमेवर पकडण्यात आलेल्या बनावट नोटा अतिशय चलाखीने छापण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला त्या बनावट आहेत, हे सहसा लक्षात येत नाही. त्यामुळेच रिझर्व बँकेने बनावट नोटांच्या तपासणीसाठी जवानांना प्रशिक्षित करावं अशी मागणी पुढे आलीय.
नोटाबंदीनंतर दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या तेव्हा त्याच्या बनावट सहजासहजी बनवता येणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानी आयएसआयने हा दावा फोल ठरवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement