एक्स्प्लोर
ATM मधून दररोज 10 हजार रुपये काढता येणार!
नवी दिल्ली : एटीएममधून दररोज साडे चार हजार रुपये काढण्याची मर्यादा शिथील करण्यात आली असून आता दररोज 10 हजार रुपये काढता येणार आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेने चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादाही वाढवली आहे. चालू खात्यातून आठवड्याला आता 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढण्यात येणार आहेत. मात्र बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या नोटाटंचाईनंतर बँकेतून पैसे काढण्यावर रिझर्व बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, सध्या करंट म्हणजेच चालू खात्यातून आठवड्याला 50 हजार रुपये तर सेव्हिंग म्हणजे बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढता येतात.
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा यापूर्वीही वाढवण्यात आली होती. अगदी सुरवातीच्या काळात दररोज फक्त 2000 रुपयांची असलेली मर्यादा अडीच हजार आणि त्यानंतर साडेचार हजार रुपये करण्यात आली होती. मात्र आता रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत मोठा दिलासा दिला आहे.
संबंधित बातमी : बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा शिथील होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement