एक्स्प्लोर

व्याजदर कमी होण्याची आशा मावळली, रेपो दर पुन्हा जैसे थे!

रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो 6 टक्के, तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला.

मुंबई : व्याजाचे दर कमी होतील ही अपेक्षा पुन्हा एकदा मावळली. कारण, रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो 6 टक्के, तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला. दरम्यान, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) महागाईत वाढ शक्य असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. या तिमाहीत हा महागाई दर 5.1 टक्के कायम राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर घटून 4.4 टक्क्यांवर आला होता. चालू आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) या काळात महागाई दर 4.7 टक्के, तर तिसरी तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) आणि चौथी तिमाही (जानेवारी ते मार्च) या काळात महागाई दर 4.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2019-20 या काळात महागाई दर 4.5 ते 4.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. विकास दर विकास दर वाढण्यात सहा घटकांची भूमिका महत्त्वाची राहील. यामध्ये जीएसटीतील अडचणी दूर करणं, कर्जाचा वाढता वेग, आयपीओ बाजारातील वाढ, बँकांना अतिरिक्त निधी, जागतिक व्यापारातील वेगाने होणारी वाढ आणि अर्थसंकल्पात मुलभूत सुविधा आणि ग्रामीण भागांच्या विकासावर भर यांचा समावेश आहे. 2018-19 मध्ये विकास दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज, 2017-18 मध्ये विकास दर 6.6 टक्के राहण्याची शक्यता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) विकास दर 7.3 टक्के कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) या काळात विकास दर 7.4 टक्के, तर तिसरी तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) 7.3 टक्के आणि चौथी तिमाही (जानेवारी ते मार्च) या काळात विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. महागाई दर आणि विकासातील धोका काय? आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर कच्च्या तेलाचे दर सरासरी 78 डॉलर प्रति बॅरल राहिले तर महागाई दरात 30 बेसिस पॉईंट्सने वाढ आणि विकास दरात 10 बेसिस पॉईंट्सची घट शक्य आहे. दरम्यान, भारत जिथून कच्च्या तेलाची खरेदी करतो, तेथील सरासरी दर 58 डॉलर प्रति बॅरल राहिला तर महागाई दरात 30 बेसिस पॉईंट्सने घट होऊ शकते आणि विकास दर 10 बेसिस पॉईंट्सने वाढण्याचीही शक्यता आहे. जागतिक विकास दर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती खाद्यपदार्थांचा महागाई दर आणि पाऊसमान सरकारच्या तिजोरीतील तोटा रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. आरबीआयचं हे सलग चौथं धोरण आहे, ज्यामध्ये दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑगस्ट 2017 मध्ये दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. व्याजदरांमध्ये कपात न झाल्यामुळे कर्जाचे हफ्ते कमी होण्याची आशा मावळली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget