एक्स्प्लोर

Ratan Tata : उद्योजक रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी, पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी नेमणूक

PM Cares Fund Trustees : केंद्र सरकारकडून उद्योजक रतन टाटा यांची नियुक्ती पीएम केअर फंडाच्या विश्वस्त पदावर करण्यात आली आहे.

PM Cares Fund Trustees : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रतन टाटा (Ratan Tata) यांची नियुक्ती पीएम केअर फंडाच्या (PM Cares Fund) विश्वस्तपदावर (Trustees) करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत निवेदन जारी करून या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पीएम केअर फंडाच्या (PM Cares Fund) विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी.थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी पीएम केअर फंडच्या नवीन विश्वस्त मंडळ आणि सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत पीएम केअर फंडातर्फे चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.

या बैठकीत नवे ट्रस्टी अर्थात विश्वस्तांखेरीज (PM Cares Fund Trustees) पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली. यामध्ये अनेक नावांचा समावेश आहे. पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीमध्ये कॅगचे माजी अध्यक्ष राजीव महर्षी (Rajiv Mehrishi), इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murty) आणि इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विश्वस्तांचं आणि सल्लागार समितीमधील सदस्यांचं स्वागत केलं. या सदस्यांचा अनुभव पीएम केअर फंडासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं की, नवीन विश्वस्त आणि सल्लागार समितीच्या सदस्यांमुळे पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळेल. या सदस्यांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव पीएम केअर फंड जनतेच्या विविध गरजांसाठी फायदेशीर ठरण्यास मदत होईल. नवीन विश्वस्तांच्या पंतप्रधान मोदींसोबत पार पडलेल्या बैठकीत विश्वस्तांनी कोरोनाकाळातील पीएम केअर फंडांच्या कामांचं कौतुक केलं. कोविड काळात या पीएम केअर फंडासाठी देशवासीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget