एक्स्प्लोर

'रेप इन इंडिया' प्रकरणी माफी मागणार नाही : राहुल गांधी

पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाची ओळख आता रेप इन इंडिया बनली आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजप आणि मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सर्व महिला खासदारांनी केली आहे. मात्र यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कठोर प्रतिक्रिया दिला आहे. मी माफी मागणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ईशान्य भारत पेटवला आहे. या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मला लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय मोदींनी यापूर्वी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल केला होता, असंही त्यांनी सांगितलं. मोदींचा 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' बनला आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी झारखंडमधील एका सभेत भाजप आणि मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसंच राहुल गांधी यांनी संसदेत माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. गोंधळ एवढा वाढला की सभागृहाचं कामकाज काहीकाळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. माफीचा प्रश्नच नाही या गोंधळानंतर संसदेबाहेर पडताच मीडियाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मी या मुद्द्यावर माफी मागणार नाही. मुख्य मुद्दा आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी संपूर्ण ईशान्य भारत जाळला आहे. या मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप मला लक्ष्य करत आहेत. मी आठवण करुन देतो की, नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं होतं. मी माझ्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतो. नरेंद्र मोदींनी 'मेक इन इंडिया' म्हटलं होतं. आम्हाला वाटलं की वृत्तपत्रांमध्ये मेक इन इंडिया दिसेल. पण आज वृत्तपत्र पाहिली तर प्रत्येक ठिकाणी 'रेप इन इंडिया' दिसतं."
राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरुन लोकसभेत गोंधळ; भाजपच्या खासदारांकडून माफीची मागणी
सुरजेवाला यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट दुसरीकडे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज (13 डिसेंबर) सकाळी एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचा उल्लेख 'रेप कॅपिटल' करत आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'मोदीजी, देशात सुरु असलेल्या अराजकतेवरुन लक्ष हटवण्यासाठी तुम्हीच संसदेचं कामकाज होऊ देत नाही. ध्यानात घ्या, देशातील मुलींना रेप-मनमानीविरोधात निर्णायक कारवाई हवी आहे. 'रेप इन इंडिया' मंजूर नाही आणि याबाबत स्वत:चं वक्तव्य ऐका, जर हे योग्य नाही, तर माफी मागा'. सुरजेवाला यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये बोलत आहेत की, 'दरदिवशी दिल्लीत बलात्कारच्या बातम्या येतात. दिल्लीला रेप कॅपिटल बनवलं आहे. दिल्लीला ज्याप्रकारे रेप कॅपिटल बनवलं आहे, त्यामुळे जगात भारताचा अपमान होत आहे. तुमच्याकडे माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी ना कोणतीही योजना आहे, ना दम. शिवाय तुम्ही यासाठी काहीही करत नाहीत.' राहुल गांधी काय म्हणाले होते? देशात होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांबाबत राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, मोदींचा 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' बनला आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेश कुठेही पाहा, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदारावरही बलात्काराचा आरोप आहे. एवढंच नाही तर पीडितेला जाळून मारलं पण मोदींनी मौन साधलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget