एक्स्प्लोर
Advertisement
राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरुन लोकसभेत गोंधळ; भाजपच्या खासदारांकडून माफीची मागणी
पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाची ओळख आता रेप इन इंडिया बनली आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजप आणि मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मोदींचा 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' बनला आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजप आणि मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसंच राहुल गांधी यांनी संसदेत माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. गोंधळ एवढा वाढला की सभागृहाचं कामकाज काहीकाळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "राहुल गांधींनी महिलाचा अपमान केला आहे. गांधी कुटुंबातील व्यक्तीचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे." "लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करावी," अशी मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. "मला अतिशय दु:ख झालं आहे, संपूर्ण देशाला दु:ख झालं आहे. अशा शब्द वापरणारे लोक सभागृहात येऊ शकतात का? त्यांनी संपूर्ण सभागृहाचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी," असं राजनाथ सिंह म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
देशात होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांबाबत राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मोदींचा मेक इन इंडिया आता रेप इन इंडिया बनला आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेश कुठेही पाहा, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदारावरही बलात्काराचा आरोप आहे. एवढंच नाही तर पीडितेला जाळून मारलं पण मोदींनी मौन साधलं आहे."
"मोदींनी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' असा नारा दिला. पण मुलींचं रक्षण करणार कोण? आज मुलींना भाजपच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे," असं राहुल गांधी म्हणाले. तसंच भाजपचे नेते 24 तास देशाची वाटणी करण्यात घालवतात. त्यांचा संपूर्ण दिवस धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र रचण्यात जातो. याचवेळी उद्योजक अदानी आणि अंबानी यांना देशाचा पैसा देण्याचंही काम करत आहेत," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.#WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said 'Make in India' but nowadays wherever you look, it is 'Rape in India'. In Uttar Pradesh Narendra Modi's MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19) pic.twitter.com/WnXBz8BUBp
— ANI (@ANI) December 13, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement