Ayodhya Ram Mandir : 6 लाख वर्ष जुन्या नेपाळच्या शिलेपासून बनवली जाणार श्रीरामल्लाची मूर्ती, काय आहे शाळीग्राम दगड आणि त्याचं महत्त्व?
Shaligram Stone : राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळहून शाळीग्राम दगड अयोध्येत आणला जात आहे. शाळीग्राम दगड आणि त्याचं महत्त्व काय? वाचा सविस्तर...
Ayodhya Ram Mandir Ram Sita Idol : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरातील (Ram Mandir) रामलल्ला (Ramlalla) आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून (Nepal) पवित्र शिला अयोध्येमध्ये आणल्या जात आहेत. दोन शाळीग्राम दगड (Shaligram Stone) रस्तेमार्गाने काही वेळातच अयोध्येमध्ये दाखल होतील. या पवित्र शाळीग्राम दगडामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाईची मूर्ती कोरण्यात येणार आहे. यासाठी नेपाळमधील दोन मोठे शाळीग्राम दगड लवकरच अयोध्येमध्ये पोहोचतील. सध्या शाळीग्राम भुवनेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. पण श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधून दगड का आणले जात आहेत आणि या दगडामध्ये नेमकं काय खास आहे जाणून घ्या...
पवित्र मानला जातो शाळीग्राम दगड
राम मंदिरातील श्रीराम आणि सीता माता यांच्या मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात येणार आहेत. शाळीग्राम अतिशय पवित्र मानला जातो. हिंदू धर्मामध्ये याला विशेष महत्त्व आहे. ज्या घरामध्ये शालिग्रामची विधीवत पूजा केली जाते, सुख आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. नेपाळमधील काळ्या रंगाचा दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो. शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे या दगडात प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे. तसेच शाळीग्रामची शिवलिंगाच्या रूपातही पूजा केली जाते.
UP | 2 Shaligram stones from Nepal arrive at Gorakhnath temple, Gorakhpur; will be taken to Ayodhya for Ram temple
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 31, 2023
"We're very happy. We've done pooja (of the stones). They'll be taken to Ayodhya soon to make idols of Lord Ram & Goddess Sita," says a priest of Gorakhnath temple pic.twitter.com/lySOrDIhfR
शाळीग्राम दगड कुठे सापडतो?
शाळीग्राम दगड नेपाळच्या गंडकी नदीत आढळतो. या दगडावर किड्याच्या आकारासारख्या खुणा असतात. विशेष म्हणजे या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात. शाळीग्राम दगडाचे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकारचे शाळीग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याचं मानलं जातं.
नेपाळहून अयोध्येत येणार शाळीग्राम दगड
अयोध्येच्या भव्य राम मंदिराचं बांधकाम सुरु आहे. मंदिरातील श्रीराम-सीतेची मूर्ती तयार करण्यासाठी शाळीग्राम दगड नेपाळमधून अयोध्येत आणला जात आहे. नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे. मूर्तीसाठी या नदीतून दोन मोठे शाळीग्राम खडक बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही खडकांचे वजन 26 आणि 14 टन आहे. हे दगड सुमारे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ayodhya Ram Mandir: 'या' चमत्कारी दगडापासून बनणार प्रभू रामाची मूर्ती, राम मंदिराचे काम प्रगतीपथावर