एक्स्प्लोर

राज्यसभा : अकाली दल नाराज, एनडीएच्या अडचणी वाढणार!

पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलने नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. यामध्ये एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलने नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हरीवंश यांच्या नावावर सहमतीसाठी अकाली दलचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्याशी स्वतः चर्चा केली. अकाली दल निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अकाली दलने एनडीएची साथ न देण्याची ही पहिलीच वेळ असेल. राज्यसभेत अकाली दलचे तीन खासदार आहेत. मात्र पक्षीय बलाबल पाहता विरोधक आणि एनडीएसाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही अविश्वास ठरावाच्या वेळी एनडीएच्या बाजूने उभं न राहता मतदानापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला होता. अकाली दल आणि शिवसेनेने एनडीएच्या बाजूने मत न दिल्यास ही निवडणूक जिंकणं एनडीएसाठी अशक्य असेल. वरच्या सभागृहात एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. एनडीएकडे जास्त मतं असली तरी बहुमत नाही. बीजेडी, एआयडीएमके, तेलंगणा राष्ट्र समिती यांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असेल. राज्यसभेत सध्या 244 सदस्य आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी 123 मतांची गरज आहे. एनडीएकडे सध्या 115 सदस्य आहेत, ज्यात भाजपचे सर्वाधिक 73 सदस्य आहेत. तर यूपीएच्या 113 जागांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक 50 जागा आहेत. हरीवंश यांनी आपण जिंकू असा दावा केला आहे. राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? एनडीए भाजप 73 जेडीयू 6 शिवसेना 3 अकाली दल 3 एआयएडीएमके 13 आरपीआय 1 सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1 तेलंगणा राष्ट्र समिती 6 नागा पिपल्स फ्रंट 1 अपक्ष 4 नामनिर्देशित 3 एकूण 115 यूपीए काँग्रेस 50 समाजवादी पक्ष 13 राष्ट्रवादी काँग्रेस 4 डीएमके 4 आरजेडी 5 इंडियन युनियन मुस्लीम लीग 1 केरळ काँग्रेस (एम) झारखंड मुक्ती मोर्चा 0 सीपीआयएम 5 बसपा 4 सीपीआय 2 तेलुगू देसम पार्टी 6 जेडीएस 1 तृणमूल काँग्रेस 13 आम आदमी पक्ष 3 नामनिर्देशित 1 एकूण 113 इतर बिजू जनता दल 9 वायएसआर काँग्रेस 2 इंडियन नॅशनल लोक दल 1 पीडीपी 2 अपक्ष 2 एकूण 16 रिक्त 1 एकूण 245
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget