नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या वागण्यातून आणि कृतीतून आपलं वेगळपण टिकवून ठेवलं आहे. अनेक वेळा त्यांनी भाजपच्या नेत्यांना हातचा आरसा दाखवला आहे. शेतकरी आंदोलकांना राष्ट्रविरोधी आणि खलिस्तानी म्हणणाऱ्या नेत्यांना राजनाथ सिंहांनी शेतकरी हे आपले अन्नदाता असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील एक प्रसिध्द डॉयलॉग आहे, 'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.' जयपूरमध्ये एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या अंशु नावाच्या मुलीसोबत असंच काहीसं घडलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात घातलेली टोपी अंशुला खूप आवडली.
एखाद्या मोठ्या नेत्याचे कपडे वा काही गोष्टी आपल्याला आवडल्या तर ती आपल्याकडेही असावी अशी आपली इच्छा होते. काही वेळेला ही इच्छा आश्चर्यकारकरित्या पूर्ण होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी अंशुला आवडलेल्या टोपीबद्दल असंच काहीसं केलं.
केरळच्या मुलीने गायले हिमाचली गीत, खुद्द पंतप्रधान मोदींकडून कौतुक
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 27 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दिल्लीवरुन राजनाथ सिंह व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडले गेले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेशची प्रसिध्द टोपी घातली होती. त्यांचा हा फोटो त्रिपूराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांचे ओएसडी संजय मिश्रा यांनी ट्वीट केला होता. या ट्वीटमध्ये राजनाथ सिंह यांना टॅग करत अंशुने ती टोपी हवी असल्याचं सांगितलं.
अंशुच्या या ट्वीटनंतर राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाकडून हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्या ठिकाणाहून अंशुच्या घरचा पत्ता मिळवण्यात आला आणि हिमाचलची शान समजली जाणारी ती टोपी अंशुच्या घरी पोहचली.
भारतात पहिल्यांदाच हिंगाची लागवड, आयातीचे अब्जावधी रुपये वाचणार!
सुरुवातीला अंशुला विश्वासच बसत नव्हता. नंतर मात्र तिचा आनंद गगणात मावेनासा झाला. तिने लगेच राजनाथ सिंह, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि त्रिपूराच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी संजय मिश्रा यांना टॅग करत त्यांचे धन्यवाद मानले. अंशुने तिच्या ट्वीटमध्ये सांगितलं की तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर असं पहिल्यांदाच झालं आहे की तिने इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण झाली. अंशुने हिमाचलची टोपी घालून आपला फोटोही शेअर केला आहे.
अभिनेता सनी देओलला कोरोनाची लागण, हिमाचलच्या आरोग्य सचिवांची माहिती