Bird Flu Symptoms : बर्ड फ्लू किंवा एविएन इन्फ्लुएन्जा हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार एवियन इन्फ्लूएंजा व्हायरस H5N1 मुळे होतो. मुख्यतः हा व्हायरस पक्षांना लक्ष्य करतो. 90च्या दशकात बर्ड फ्लूच्या नवा स्ट्रेन समोर आला होता. बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन गंभीर आजार आणि मृत्यूचं कारण ठरु शकतो. या व्हायरसचा धोका पाळीव पक्षांना म्हणजेच, बदक, कोंबडी किंवा टर्की यांसारख्या पक्षांना अधिक असतो. या व्हायरसचा संसर्ग बाधित पक्षांमुळे होतो.


अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या होतो, परंतु ते पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरते. विष्ठा, नाकाचा स्राव, तोंडातील लाळ किंवा संक्रमित पक्ष्यांच्या डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे हा आजार मानवांमध्ये पसरतो. एच 5 एन 1 हा असा एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो मानवांना संक्रमित करतो. हा विषाणू पक्षी तसेच मानवांसाठी खूप धोकादायक आहे. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये त्याचे पहिले प्रकरण उघडकीस आले होते. व्हायरस म्युटेशन होतं, तसेच काही म्युटेशन जास्त संसर्गजन्य असल्याचा धोकाही संभवतो. परंतु, सध्या देशात थैमान घालणारा बर्ड फ्यूचं म्युटेशन जास्त संसर्गजन्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, असं असंल तरिही काळजी घेणं गरजेचं आहे.


कसा पसरतो बर्ड फ्लू?


एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या संपर्कात आल्याने या आजाराची लागण होऊ शकते. संसर्ग झालेला पक्षी, त्याचे पंख किंवा त्याच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानंही बर्ड फ्यूचा मानवाला संसर्ग होऊ शकतो. या आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्षांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना अधिक आहे. जगभरात अनेक पोल्ट्री फर्म आहेत. अशा ठिकाणी दररोज पक्षांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात. असं असलं तरिदेखील याबाबतीत अनेक अपवादात्मक प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आजारी पक्षाच्या संपर्कात आल्यानं बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. पक्षाची अंडी किंवा त्याची विष्ठा अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने धोका अधिक वाढतो.


पाहा व्हिडीओ : देशातील 'या' राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चं संकट



खरचं, बर्ड फ्लू संसर्गजन्य आहे का?


बर्ड फ्लूचा संसर्ग अनेक पक्षांच्या प्रजातींमध्ये वेगाने होतो. परंतु, साधारणपणे, एविएन इन्फ्लुएन्जा हा व्हायरस किंवा बर्ड फ्लू व्यक्ती किंवा पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक नाही. दरम्यान, एखाद्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग झाल्याची प्रकरणं फारच कमी दिसून आली आहेत. अशातच बर्ड फ्यूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेणंही धोकादायक ठरु शकतं.


काय आहे बर्ड फ्लू ची लक्षणं?


साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 8 दिवसांनी लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळांचे आजार यांसारखी लक्षणं दिसून येतात. प्रौढ व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही याच लक्षणांचा सामना करावा लागतो. तसेच हे व्हायरल संक्रमण वाढून न्यूमोनिया होऊ शकतो आणि कधी-कधी श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनामागोमाग देशावर 'बर्ड फ्लू'चं संकट; 'या' राज्यांत सतर्कतेचा इशारा