99 रुपयांची स्पेशल ऑफर, त्यात सुट्टीचा दिवस आणि बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता; TRP गेम झोनमधील मृत्यूतांडवांची आँखो देखी कहानी!
Gujarat News: गुजरात राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 9 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Rajkot TRP Game Zone Fire Updates: राजकोट : गुजरातच्या (Gujarat News) राजकोटमधील गेमझोनमध्ये (Rajkot Game Zone Fire) लागलेल्या आगीत 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, दहापेक्षा अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे. तर आगीच्या ठिकाणी आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. आगीत गेमझोन जळून खाक झालं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरम्यान, आग लागली त्यावेळी गेमझोनमध्ये मोठी गर्दी होती. तसेच, याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठाही असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 9 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं बचावकार्य सुरू केलं. आग लागली त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. कारण शनिवार सुट्टीचा दिवस होता. महत्त्वाची बाब म्हणजे, शनिवारी गेम झोनमध्ये 99 रुपयांची स्पेशल ऑफर ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक गेम झोनमध्ये उपस्थित होते. तसेच, गो कार रेसिंगसाठी 1500 ते 2 हजार लिटर डिझेल आणि 1000 ते 1500 लिटर पेट्रोल गेम झोनमध्ये साठवलं जात असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, रेंज आयजी अशोक कुमार यादव यांनी आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
गेमिंग झोनमध्ये आगीच्या घटनेची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक बिघाडामुळे आगी लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आगीचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसीही मिळाली नसल्याचं समोर आलं आहे. याबाबतची अधिक माहितीही अग्निशमन विभागाकडूनच दिली जाणार आहे.
गेमिंग झोनमध्ये डिझेल आणि पेट्रोलचा मोठा साठा
टीआरपी गेम झोनमध्ये 1500 ते 2000 लिटर डिझेल जनरेटर आणि गो कार रेसिंगसाठी 1000 ते 1500 लिटर पेट्रोल साठवलेलं होतं, त्यामुळे आग वेगानं पसरली आणि संपूर्ण गेमझोन जळून खाक झाला. गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी 6 ते 7 फुटांचा एकच मार्ग होता. आज प्रवेशासाठी 99 रुपयांची योजना होती, त्यामुळे अपघाताच्या वेळी गेम झोनमध्ये मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. शनिवारी संध्याकाळी जेव्हा ही दुर्घटना घडली, त्यावेळी गेम झोनमध्ये खेळणाऱ्या लोकांपैकी जे पहिल्या मजल्यावरुन बाहेर आले त्यांनी सांगितलं की, अचानक गेम झनमधल्या स्टाफनं आम्हाला सांगितलं की, आग लागली आहे, तुम्ही तात्काळ बाहेर पडा. त्यानंतर आम्ही सर्वजण तिथून बाहेर पडलो. पहिल्या मजल्यावरुन बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता होता. दरम्यान, गुजरात राजकोट गेम झोन दुर्घटनेप्रकरणी गेम झोनचा मालक आणि मॅनेजरसह 3 लोकांना अटक झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राजकोट गेम झोन अग्नितांडव, 32 जणांचा होरपळून मृत्यू; पाहा अंगावर शहारे आणणारे PHOTO