(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलनला जामीन, 'या' आरोपांखाली झाली होती अटक
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत आरोपींपैकी एक असणाऱ्या पेरारिवलन याला सुप्रीम कोर्टाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी पेरारिवलन याला सुप्रीम कोर्टाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या मते पेरारिवलन 30 वर्षाहून अधिक काळ जेलमध्ये राहिला आहे, या काळात त्याची जेलमधील वागणूक अत्यंत चांगली असून सरकारकडून निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होत असल्यास यासाठी त्याला जेलमध्ये ठेवणं योग्य नाही. असं कोर्टाने सांगितलं आहे. दरम्यान राजीव गांधी यांच्या हत्येदरम्यान झालेल्या स्फोटात वापरलेल्या साहित्याचा पुरवठा करण्याचा मोठा आरोप पेरारिवलन याच्यावर होता.
21 मे, 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडुच्या श्रीपेरंबुदूर याठिकाणी हत्या झाली होती. 11 जून 1991 रोजी पेरारिवलन याला अटक करण्यात आली. या हत्येदरम्यान झालेल्या स्फोटात वापरलेली 8 वोल्टची बॅटरी मास्टरमाइंड शिवरासनला पेरारिवलन याने दिल्याचा आरोप त्याच्यावर होता.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारचे अॅडिशनल सॉलिसीटर जनरल एम. नटराज यांनी पेरारिवलनच्या जामीनाला विरोध केला. ते म्हणाले, आरोपीला 1999 मध्ये फाशीची शिक्षा मिळाली होती. 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने याला जन्मठेपेत बदललं. यावेळी राष्ट्रपती त्याच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यासाठी दिरंगाई करत असल्याचं सांगण्यात आलं. तसंच तो बराच काळ जेलमध्ये असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे एकदा या गोष्टींमुळे आरोपीला दया दाखवली असल्याने पुन्हा याच आधारावर दया दाखवणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले. एडिशनल सॉलिसीटर जनरलने देखील यावेळी दिलेल्या माहितीत सांगितलं की, पेरारिवलनची शिक्षा माफ करण्याचं काम केंद्राचं आहे. कोर्टाचं याबाबतीत निर्णय देणं योग्य नाही. दरम्यान न्यायाधीशांनी या सर्व गोष्टींचा विचार करत अखेर मात्र आरोपीला जामीन देणं योग्य असल्याचं सांगत निर्णय सुनावला. कोर्टाच्या मते राज्य सरकार, राज्यपाल आणि केंद्र या सर्वांची बाजू ऐकली जाईल पण तोवर आरोपीला जेलमध्ये ठेवणं योग्य नाही. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mamata Banerjee : ज्या दिवशी चांगला पर्याय तयार होईल; त्या दिवशी भाजप सत्तेतून बाहेर जाईल, ममता बॅनर्जींचा निशाणा
- Sharad Pawar : फडवणीसांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्त्युत्तर, म्हणाले...
- Russia-Ukarine War : भारताने पाकिस्तानी विद्यार्थीनीची युक्रेनमधून केली सुटका, PM मोदींचे आभार मानत म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha