उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा
Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्याआधी यूपीमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
![उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा Raj Thackeray will not be allowed to enter Ayodhya without apologizing to North Indians, wans BJP MP Brijbhushan Singh उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/7b4b3fff93e9664dacb203d52cac9da0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : "उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही," असा धमकीवजा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.
एबीपीशी संवाद साधताना खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, "प्रभू राम हे उत्तर भारतीय होते आणि त्यांच्या वंशजांना राज ठाकरेंनी मारहाण केली. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी आणि अयोध्येत जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यांना (राज ठाकरे) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटू देणार नाहीत." "तसंच राम मंदिर आंदोलनात ठाकरे कुटुंबाची कोणतीही भूमिका नव्हती," असंही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.
'योगींनाही राज ठाकरेंना न भेटण्याची विनंती केली'
ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, "मी योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांची भेटही घेऊ नये." "हे आजचं नाही, मी 2008 पासून पाहत आहे. त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला, उत्तर भारतीयांना मारहाण केली. मुंबईच्या विकासात इतर लोकांचा 80 टक्के वाटा आहे," असा दावाही ब्रिजभूषण सिंह यांनी केला.
राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुण्यात 17 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.
अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोस्टर
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनसमोर मनसेकडून पोस्टर लावण्यात आले होते. जूनमध्ये राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पोस्टरमधून जनतेला राज ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात आलं आहे. "जय श्रीराम... धर्मांध नाही, मी धर्माभिमानी... चला अयोध्या! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा. ऐतिहासिक दिवस 5 जून 2022" असा मजकूर या पोस्टरवर होता.
संबंधित बातम्या
Raj Thackeray : राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामांचे दर्शन; 5 जून रोजी अयोध्या दौरा
Hanuman Chalisa Row : चला अयोध्या! 'या' तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर, मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)