एक्स्प्लोर
दिल्ली-मुंबई रेल्वे प्रवास फक्त 10 तासात पूर्ण होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार रेल्वे विभागाने येत्या 100 दिवसांसाठीच्या कामाच रोडमॅप तयार केला आहे. त्यामध्ये या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : पुढील काही वर्षात दिल्ली-मुंबई हा प्रवास सुपरफास्ट ट्रेनने केवळ 10 तासांत पूर्ण करता येणार आहे. रेल्वे विभागाकडून याबाबत प्रयत्न सुरु करण्यात आले असून येत्या 4 वर्षात हा प्रकल्प पुर्ण होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
देशाची राजधानी दिल्ली पासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपर्यंत केवळ 10 तासात पोहचता यावं यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच दिल्ली-हावडा हे अंतर 12 तासांत पूर्ण करता यावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार रेल्वे विभागाने येत्या 100 दिवसांसाठीच्या कामाच रोडमॅप तयार केला आहे. त्यामध्ये या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांसाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली-मुंबई तसेच दिल्ली-हावडा या दोन मार्गांवरील रेल्वेचा जास्तीत जास्त वेग 160 किमी प्रती तास पर्यंत वाढवल्यास या मार्गांवरील प्रवासाचा वेळ 5 तासांनी कमी होऊ शकतो. दिल्ली-हावडा या प्रवासासाठी सध्या 17 तास लागतात. नवीन प्रकल्प पुर्ण झाल्यास हा कालावधी 12 तासांपर्यंत कमी होऊ शकतो. तर दिल्ली-मुंबई हा प्रवास देखील 15 तासांवरुन 10 तासापर्यंत कमी होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement