(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trains Ticket Price Hike: कोरोना काळात रेल्वेला मोठा फटका, तिकीट दरवाढीवर रेल्वेचं स्पष्टीकरण
रेल्वेने कोरोना संकटाच्या आधीच्या तुलनेत 65 टक्के मेल एक्स्प्रेस गाड्या चालवण्यास सुरूवात केली आहे. तर 90 टक्के उपनगरी गाड्याही सुरु केल्या आहेत. यावेळी एकूण 326 पॅसेंजर ट्रेन रोज धावत आहेत.
नवी दिल्ली : रेल्वेने पॅसेंजर ट्रने आणि कमी अंतराच्या ट्रेनच्या भाड्यात वाढ केली आहे. गेल्या 30 दिवसांपासून झालेल्या भाडे वाढीवर रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रवासी आणि इतर कमी अंतराच्या गाड्यांचे भाडे काहीसे जास्त ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेने दिली. हे भाडे समान अंतरासाठी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित तिकिटांच्या किंमतीवर निश्चित केले आहे.
रेल्वेने कोरोना संकटाच्या आधीच्या तुलनेत 65 टक्के मेल एक्स्प्रेस गाड्या चालवण्यास सुरूवात केली आहे. तर 90 टक्के उपनगरी गाड्याही सुरु केल्या आहेत. यावेळी एकूण 326 पॅसेंजर ट्रेन रोज धावत आहेत. तर 1250 मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि 5350 उपनगरी ट्रेन्स सुरू आहेत. रेल्वेने सांगितलं की, सध्या धावत असलेल्या कमी अंतराच्या पॅसेंजर ट्रेन्स एकून पॅसेंजर ट्रेन्सपैकी केवळ 3 टक्के आहेत. त्यामुळे फारच कमी प्रवासी यातून प्रवास करत आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चांगली गोष्ट आहे.
भाडेवाढीबाबत रेल्वेकडून स्पष्टीकरण देताना हे देखील सांगितलं की. प्रवासी सेवेवर नेहमीच अनुदान दिले जाते आणि प्रत्येक प्रवाशाच्या प्रत्येक प्रवासात रेल्वेला तोटा सहन करावा लागतो. अशा अनेक गाड्या रेल्वेदेखील चालवत आहे. ज्यांच्या जागा फारच कमी भरल्या जात आहेत.
रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रवासी गाड्यांसाठी कोरोनापूर्व कालावधीपेक्षा किंचित जास्त भाडे आकारले जात आहे. कोविड काळात आवश्यक असलेल्या मार्गदर्शक नियमावलीच्या अनुषंगाने सेवा पूर्ववत करण्यासाठी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे, असं रेल्वेने म्हटलं आहे.
Corona: महाराष्ट्रातून दिल्लीत प्रवेश करण्यासाठी आता कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक
लवकरच पॅसेंजर ट्रेन्सची संख्या वाढणार दोन राज्यांत प्रवासी गाड्या चालवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय याशिवाय राज्य सरकारची संमती घ्यावी लागेल. या प्रक्रियेनंतर लवकरच देशभरात पॅसेंजर ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येणार आहे.