एक्स्प्लोर
Advertisement
Budget 2020 | अर्थसंकल्पातून रेल्वेला काय मिळालं?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी फार मोठ्या घोषणांची घोषणा केली नाही, परंतु 150 खासगी गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. नवीन हाय स्पीड ट्रेनसह तेजस ट्रेन्ससाठी नव्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. रेल्वेची कमाई कमी आहे. देशातील 550 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.
अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळालं?- देशात तेजससारख्या ट्रेन्स चालवल्या जाणार आहे. या ट्रेन्सने पर्यटन स्थळांना जोडलं जाणार आहे.
- 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिला जाणार आहे.
- 150 खासगी ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत.
- देशभरातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केल्या जाणार.
- २७ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात येणार
- रेल्वे रुळांलगत सौरऊर्जा ग्रीड बसवण्याची योजना आहे.
- मुंबई-अहमदाबाद मार्गावर हायस्पीट ट्रेन चालवली जाईल.
- 148 किमी बंगळुरु उपनगरीय ट्रेन सिस्टम तयार करणार, केंद्र सरकार यासाठी 15 टक्के निधी देणार
- राष्ट्रीय महामार्ग, 3 हजार किमीच्या कोस्टल रोडची उभारणी करणार
- मुंबई-दिल्ली मेगाहायवे 2023 पर्यंत पूर्ण करणार
- बंगलोर-चेन्नई महामार्गाचं कामंही लवकरच पूर्ण करणार
- देशभरात नवी 100 विमानतळं विकसित करण्यावर भर
- अडीच हजार किमी एक्स्प्रेस हायवे, तर 9 हजार किमीचा इकॉनॉमिक कॉरिडोर उभारणार
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे, चेन्नई-बेंगळुरू एक्स्प्रेस लवकरच तयार होणार
- 2024 पर्यंत 6 हजार किमी हायवे तयार करण्याचं लक्ष्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement