Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवणार, यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची घोषणा
Rahul Gandhi Contest Amethi : काँग्रेस खासदार (Congress) राहुल गांधी लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
अमेठी : देशातील सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या तयारीला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. यासोबत त्यांनी प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातू लढण्याची शक्यता आहे, हेही सांगितलं आहे.
राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात
उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी प्रियंका गांधींबाबत सांगितलं की, जर प्रियंका गांधी यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर, त्या वाराणसीमधून निवडणूक लढू शकतात. त्यांच्यासाठी आमचे कार्यकर्ते काहीही करायला तयार आहेत. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. अमेठी मतदार संघात राहुल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केला होता.
#WATCH राहुल गांधी अमेठी से चुनाव लड़ेंगे। प्रियंका जी चाहें तो वाराणसी से चुनाव लड़ सकती हैं, हमारा एक एक कार्यकर्ता उनके लिए जान लगा देगा: उत्तर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अजय राय pic.twitter.com/yjHH4XrCxs
— ANI_HindiNews (@AHindinews) August 18, 2023
अमेठी मतदारसंघ काँग्रेस कुटुंबियांचं खास नातं
अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस कुटुंबियांचं खास नातं आहे. याच मतदारसंघातून याआधी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी तयार?
सध्या राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून खासदार आहेत. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) चे पीपी सुनीर यांचा लाखो मतांच्या फरकाने पराभव केला होता. आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या घोषणेनेमुळे राहुल गांधी पुन्हा अमेठीमधून रिंगणात उतरणार या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडे मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना त्यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी परत मिळाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :