एक्स्प्लोर

राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार!

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आजपासूनच 'राहुल राज'ची तयारी सुरु होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अध्यक्षपदासाठी आतापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे. सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे 900 नेते उपस्थित राहणार राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभरातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित राहतील. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल होणार आहेत. काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, अध्यक्षपदाच्या निवणुकीत 10 AICC सदस्यांनी उमेदवारासाठी प्रस्ताव ठेवणं आवश्यक असतं. मिळालेल्या माहितीनुसार, 10 AICC सदस्यांचे 90 ग्रुप राहुल गांधींचा प्रस्ताव देतील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेआधी राहुल गांधी राजघाटावर सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा देखील राहुल गांधींना प्रस्ताव देणाऱ्यांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेआधी राहुल गांधी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते मंदिरातही जाणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया - काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. - उद्या म्हणजेच 5 डिसेंबरला अर्जांची छाननी करुन वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. - यानंतर 11 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. - एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 19 डिसेंबर रोजी मतदान होईल. - जर मतदान झालं तर 19 डिसेंबरलाच नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल. दरम्यान, गेल्या काही दिवसात विरोधी सूर उमटले असले तरी राहुल गांधी यांचा काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मार्ग आजच मोकळा होईल, हे जवळपास निश्चित आहे.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी 1) आचार्य कृपलानी – 1947 2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49 3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950 4) जवाहरलाल नेहरु – 1951-54 5) यू. एन. धेबर – 1955-59 6) इंदिरा गांधी – 1959 7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63 8) के. कामराज – 1964–67 9) निजलिंगअप्पा - 1968 10) जगजीवनराम – 1970–71 11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74 12) देवकांत बरुआ – 1975-77 13) इंदिरा गांधी – 1978–84 14) राजीव गांधी – 1985–91 15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96 16) सिताराम केसरी – 1996–98 17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget