एक्स्प्लोर

Rahul Gandhi Passport : राहुल गांधी यांना न्यायालयाचा दिलासा, नवीन पासपोर्ट जारी करण्यास परवानगी, दहाऐवजी तीन वर्षांसाठी एनओसी

Rahul Gandhi Passport : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट जारी करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला दिल्लीतील न्यायालयाने आज परवानगी दिली. कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टबाबत तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.

Rahul Gandhi Passport : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवीन पासपोर्ट (Passport) जारी करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला दिल्लीतील न्यायालयाने आज (26 मे) परवानगी दिली. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टबाबत तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. पासपोर्टबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे निर्देश अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी दिले आहेत. याचा अर्थ राहुल गांधींना आता तीन वर्षांनंतर एनओसीसाठी कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.

दहा वर्षांच्या एनओसीसाठी राहुल गांधींकडे ठोस कारण नाही : सुब्रमण्यम स्वामी 

खरंतर राहुल गांधी यांनी न्यायालयाकडे 10 वर्षांसाठी एनओसीची मागणी केली होती, परंतु सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला आणि केवळ एक वर्षासाठी एनओसीसाठी परवानगी देण्याचं म्हटलं होतं. परंतु राहुल गांधींकडे पासपोर्ट जारी करण्यासाठी 10 वर्षांची एनओसी मागण्याचे कोणतेही वैध किंवा ठोस कारण नाही, असा युक्तिवाद स्वामी यांनी न्यायालयात केला होता. 

नवीन पासपोर्टसाठी एनओसी मागणाऱ्या राहुल गांधी यांच्या याचिकेवर बुधवारी (24 मे) दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या एनओसीला सुब्रमण्यम स्वामींनी विरोध केला. ते म्हणाले की होते की, "ते (राहुल गांधी) सातत्याने परदेशात जातात. त्याच्यां परदेशवारीमुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो." सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्वामी यांना उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. या उत्तरात सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना 10 वर्षांसाठी पासपोर्ट देण्याच्या याचिकेला विरोध केला होता.

राहुल गांधी यांना नवीन पासपोर्टची आवश्यकता का?

मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं. यानंतर राहुल गांधींनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांचं नाव असल्याने राहुल गांधींना सामान्य पासपोर्ट जारी करण्यासाठी न्यायालयाकडून एनओसीची आवश्यकता आहे. तसंच नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामीन मंजूर करताना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यावर कोणतेही बंधन घातलं नव्हतं, असं राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा

दरम्यान, राहुल गांधी 31 मे रोजी आठवडाभरासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे भारतीयांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Embed widget