एक्स्प्लोर

राहुल गांधींचा असाही एक अंदाज...; मोच्याच्या दुकानात चपला, बुटं शिवताना दिसले, सर्वच चक्रावले

Rahul Gandhi On Sultanpur: राहुल गांधींचा आगळा वेगळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोय. राहुल गांधी एका मोच्याच्या दुकानात चपला, बुटं शिवताना दिसले. राहुल गांधी नेमकं करतायत काय? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

Rahul Gandhi On Sultanpur: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शुक्रवारी (26 जुलै) मानहानीच्या खटल्यात हजर राहण्यासाठी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर न्यायालयात पोहोचले होते. यादरम्यान राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा आगळा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. न्यायालयात हजेरी लावल्यानंतर तिथून परतत असताना राहुल गांधी अचनाक एका दुकानात पोहोचले. ते दुकान होतं एका मोच्याचं. त्या दुकानात थांबून त्यांनी तेथील लोकांची विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी दुकानात थांबून चपला आणि बुटांना टाके घातले. दुकानदाराच्या मदतीनं चपल कशी शिवली जाते हे पाहता-पाहता स्वतःही ती चप्पल शिवून पाहिली. 

रायबरेलेची खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 26 जुलै रोजी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयीन कामकाज संपवून राहुल गांधी पुन्हा पूर्वांचल एक्सप्रेसवे मार्गे लखनौला रवाना झाले. त्यावेळी तिथून ते दिल्लीला जाणार होते, मात्र पूर्वांचल द्रुतगती मार्गापूर्वी त्यांचा ताफा अयोध्या प्रयागराज महामार्गावरील कुरेभर पोलीस स्टेशन हद्दीतील आमदार नगर चौकाजवळ अचानक थांबला आणि राहुल गांधी गाडीतून उतरले आणि रामचेत नावाच्या मोच्याच्या दुकानाकडे निघाले. 

अचानक मोच्याच्या दुकानात पोहोचले राहुल गांधी 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाऊन रामशेत यांच्या शेजारी त्यांच्या दुकानात बसून त्यांची प्रकृती जाणून घेतली. राहुलला पहिल्यांदा रामचेत यांच्याकडून त्याच्या व्यावसायाबाबत आणि कुटुंबाबाबत गप्पा मारल्या. मग, रामचेत यांना विचारलं की, गरिबांना कोणत्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे आणि त्यावरही चर्चा केली. शूज आणि चप्पल कशा दुरुस्त केल्या जातात? असा प्रश्नही राहुल यांनी रामचेतला विचारलं. घर कसं सांभाळायचं याबाबतही त्यांनी रामचेतकडे विचारपूस केली. राहुल गांधी आपल्या दुकानात आले, तिथे त्यांनी स्वतःच्या हातानं बुटांना, चपलांना टाके घातले, हे पाहून रामचेत काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी त्यांच्या छोट्याशा दुकानात बसून चप्पल शिवत आहेत, यावर त्यांना आधी विश्वासच बसत नव्हता. यानंतर रामचेत यांनी राहुल गांधींसाठी कोल्ड्रिंक मागवलं आणि दोघांनी एकत्र कोल्ड्रिंक प्यायलं. रामचेत यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

चप्पला, बुट शिवून दाखवले : रामचेत 

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यावर मोची राम चेत यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही त्यांना (राहुल गांधी) सांगितलं आहे की, मी भांडवलापेक्षा फारच कमी कमावतो, मी गरीब आहे. कृपया आम्हाला थोडी मदत करा. मी त्यांना बुटांना शिलाई कशी करायची ते दाखवलं. राहुल गांधी यांनीही त्यांना मदत केली. मोच्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताRatnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरुTirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Embed widget