एक्स्प्लोर

Rahul Gandhi on RSS : राहुल गांधींचा PM मोदी-RSS वर हल्लाबोल; म्हणाले, 'आरएसएससाठी भारत हा केवळ एक नकाशा'

Rahul Gandhi on RSS : केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगापासून मीडिया ते सोशल मीडिया कंपन्यावरही निशाणा साधलाय.

Rahul Gandhi on RSS in Cambridge University : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी मोदींची तुलना कोरिया मॉडेलशी केली. या दरम्यान, निवडणूक आयोगापासून मीडिया ते सोशल मीडिया कंपन्यावरही राहुल गांधी यांनी निशाणा साधलाय. केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील बदलाबाबतही बोलले. तसेच चीनच्या विस्तारवादी धोरणापासून ते युक्रेन युद्धाबाबत मत व्यक्त केले.
 
राहुल गांधींच्या निशाण्यावर PM मोदी - RSS

संभाषणादरम्यान राहुल गांधी यांनी दावा केला की, भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मोदींच्या आर्थिक धोरणांची कोरियाशी तुलना करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी कोरिया मॉडेलनुसार विचार करतात, त्यांना वाटते की, मोठ्या लोकसंख्येला एखादी अल्प रक्कम देऊन ते काही लोकांच्या नियंत्रणाखाली सत्ता आणि संपत्ती आणू शकतात.

आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा - RSS वर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, भारतातील लोकशाहीची मूलभूत संरचना एका संस्थेने काबीज केली आहे. राहुल म्हणाले की, संविधानानुसार भारत हे एक राष्ट्र नसून विविध राज्यांचे संघटन आहे आणि राज्यांमध्ये संवाद आवश्यक आहे. काँग्रेस भारताकडे संवाद म्हणून पाहते तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा आहे. 

'भारताचा आवाज बनलेल्या संस्थांवर हल्ला'

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आज भारताचा आवाज बनलेल्या संस्थांवर हल्ले होत आहेत. काँग्रेसमधील बदल आवश्यक असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, यासाठी पक्षाचे दरवाजे लाखो तरुणांसाठी आधी उघडावे लागतील.

देशाच्या विकासात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका : राहुल

याशिवाय राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस गेल्या सात वर्षांपासून सत्तेत नसली तरी आपण सत्तर वर्षांपासून सत्तेत आहोत, भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक पक्ष अशा  टप्प्यातून जातो. आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल आणि आपली भूमिका नव्या पद्धतीने समजून घ्यावी लागेल. भारतातील राष्ट्रीय पक्ष हा सर्वांना एकत्र आणणारा पक्ष असेल. काँग्रेससाठी हे आव्हान नसून मोठी संधी आहे. आरएसएस-भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीत लढा आहे. 

निवडणूक आयोग आणि मीडियावर टोमणा मारला

मोदींच्या निवडणुकीतील यशाच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, निवडणुकीत मजबूत निवडणूक व्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था, प्रेस, निधीचे स्रोत महत्त्वाचे असतात. मात्र निवडणूक आयोगाकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही. मीडियात एकच चेहरा (मोदींची) सावली आहे. सोशल मीडियावर त्यांची पूर्ण पकड आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचे नाव घेत राहुल गांधी यांनी मोठ्या सोशल मीडिया कंपन्या न्याय्य नसल्याचा आरोप केला. मार्क झुकेरबर्गचे नाव न घेता ते म्हणाले की, फेसबुकचा प्रमुख विरोधी पक्षनेत्याला भेटत नाही, फक्त पंतप्रधानांना भेटतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget