एक्स्प्लोर
राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार?
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या हाती काँग्रेसची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींकडे पक्षाध्यक्ष पद सोपवलं जाऊ शकतं.
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या हाती काँग्रेसची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींकडे पक्षाध्यक्ष पद सोपवलं जाऊ शकतं. लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे, त्यात राहुल गांधींचं पारडं जड असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या ऑक्टोबरच्या बैठकीत राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. कार्यकारिणीच्या निर्णयापेक्षा निवडणूक प्रक्रियेवर भर देण्यासंबंधी राहुल गांधींना कल्पना देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसला देशात विविध राज्यांमध्ये सातत्यानं हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवली जाऊ शकते.
दरम्यान काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचं टाईम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं नाव आधीपासूनच चर्चेत होतं. आता पुढच्याच महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत राहुल गांधी पक्षाध्यक्ष होतील, अशी आशा वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केली.
राहुल गांधींना या निवडणुकीबद्दल विचारलं असता त्यांनी स्वत:ला संघटनात्मक निवडणुकीसाठी तयार असून निवडणुकीनंतरच ते पंतप्रधानपदाचे दावेदार असतील असं म्हटलं आहे. तसंच लवकरच पक्षात मोठे सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement