एक्स्प्लोर
बाबरी विध्वंसानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी अयोध्येत
लखनऊ: बाबरी विद्ध्वंसानंतर पहिल्यांदाच गांधी परिवारातील सदस्याने अयोध्येला भेट दिली. तब्बल 24 वर्षांनी राहुल गांधी यांनी किसान सभेच्या निमित्ताने अयोध्या नगरीत हजेरी लावली.
यावेळी त्यांनी अयोध्येतील हनुमानगढीवरील मंदिरात पूजा केली.
1992 मध्ये अयोध्येतील बाबरी विद्ध्वंस घडला होता. त्यानंतर आजपर्यंत गांधी परिवारातील कोणीही अयोध्येत हजेरी लावली नव्हती.
राहुल गांधी हनुमानगढीमध्ये दाखल होताच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी येथील दुकाने बंद करण्यात आली. तसेच सर्वसामान्यांना मंदिरात दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. राहुल गांधींनी पूजा केलल्यानंतर महंत ज्ञानदास यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.
या भेटीची माहिती देताना महंत ज्ञानदास यांनी राम मंदिर प्रश्नावर राहुल गांधींशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असेल, त्याच्या बाजूने काँग्रेस उभी असेल असे अश्वासन राहुल गांधींनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
राहुल गांधी फैजाबाद जिल्ह्यात एक रोड शो करणार असून, यानंतर आंबेडकरनगर जिल्ह्यात एका दर्ग्यालाही भेट देणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement