एक्स्प्लोर
अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड!
अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
नवी दिल्ली: अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली.
राहुल गांधी बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.
दरम्यान, राहुल गांधींच्या निवडीनंतर दिल्ली काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रंगांची उधळण करुन, आनंद व्यक्त केला.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं.
काँग्रसचे 18 वे, गांधी घराण्यातील सहावे
दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.
याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017
18) राहुल गांधी - 2017 पासून
संबंधित बातम्या
गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य
‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका
राहुल गांधींवरुन पूनावाला बंधूंमध्ये वाद, तहसीन यांनी नातं तोडलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement