एक्स्प्लोर

राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर

भिवंडी : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या हमीवर राहुल गांधींना जामीन मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल केलेल्या विधानामुळे राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असं संघाने म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी आज सकाळी दहा वाजता भिवंडी कोर्टात हजर राहिले होते. 1 सप्टेंबर रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, "मी अब्रुनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यास तयार आहे. महात्मा गांधी हत्यासंदर्भातील माझ्या वक्तव्यातील प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे." तक्रारदाराची अट गांधी हत्येच्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी, तसंच यापुढे असं विधान करणार नाही, याची हमी द्यावी, तरच खटला मागे घेऊ, असं तक्रारदाराने कोर्टात सांगितलं. मात्र राहुल गांधींच्या वकिलाने पुढील तारखेची मागणी केली. काय आहे प्रकरण? 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भिवंडी येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या लोकांचा हात होता, असा सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र हा खटलाच रद्द करावा, अशी याचिका राहुल गांधी यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर राहुल यांच्या वकिलांनी त्यांना या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मात्र हायकोर्टाने ती मागणीही अमान्य करत, भिवंडी कोर्टातच दाद मागण्याचे आदेश दिले. संबंधित बातम्या

माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा, राहुल गांधींना कोर्टाने फटकारलं

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget