एक्स्प्लोर

Winter session I हिवाळी अधिवेशनाच्या 5 व्या दिवशीही राहुल गांधी गैरहजर

संसदेचं हिवाळी अधिवेश सुरु होऊन 5 दिवस झालेत. मात्र, या 5 दिवसात एकही दिवस काँग्रेसचे नेते राहुल गांधी हजर राहिले नाहीत. यावरुन आता त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. सध्या संसदेत महत्वाची विधयके मांडली जात असताना राहुल गांधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोकसभेत सध्या दिल्लीतील वाढलेलं प्रदूषण, एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप), जम्मू काश्मीरची परिस्थिती, गांधी कुटुंबाची काढलेली एसपीजी सुरक्षा यावरुन संसदेच्या खालच्या सभागृहात चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी उपस्थित का नाहीत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील 5 दिवसात फक्त एकच दिवस सभागृहात उपस्थित राहिले आहेत. यावरुन भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी टीका केली आहे. तरुण खासदारांनी सभागृहात गैरहजर राहणे निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. आम्ही वयस्क असतानाही सभागृहात हजर राहतो. या खासदारांचा असा दृष्टीकोण योग्य नसल्याचे पाल म्हणाले. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून ते आपल्याला संसदेत पाठवतात. मात्र, तरीही राहुल गांधी एकही दिवस सभागृहात हजर नसल्याची टीका भाजप नेत्याने केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. लोकसभेत मांडली जाणारी महत्वाची विधयके - राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी)- एनआरसीवरुन सध्या सत्ताधारी भाजपला कोंडीत सापडली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले. धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असं शहा यांनी सांगितलं. दिल्लीचे वाढते प्रदूषण - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष यांनी तोंडाला मास्क घालून सभागृहात दाखल झाल्या होत्या. मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन देखील काकोली घोष यांनी केले. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती - काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरुन काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यास 4 महिने पूर्ण होत आहे. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटवल्याने संसदेत गोंधळ, सरकारने सूडबुद्धीने सुरक्षा हटवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget