एक्स्प्लोर
राफेलच्या मुद्द्यावर मोदींनी 20 मिनिटं चर्चा करावी : राहुल गांधी
मोदी सरकार राफेल मुद्द्याची जेपीसी चौकशी का करत नाही? माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये कोणत्या फाईल्स आहेत? मोदींचं कोणतं गुपित त्यांच्याकडे दडलं आहे? सरकार सत्य दाबण्याचा जितका प्रयत्न करेल, तितकंच ते उसळून येईल, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
नवी दिल्ली : आजचा दिवस राफेलवरील वादाच्या तीन अंकांनी गाजला. तिसरा अंक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फक्त 20 मिनिटं राफेलवर माझ्याशी चर्चा करावी, असं खुलं चँलेज राहुल गांधींनी दिलं. लोकसभेतील गदारोळानंतर राफेल मुद्यावरुन राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
त्याआधी लोकसभेत वादाचा दुसरा अंक झाला होता. राफेलच्या आरोप-प्रत्यारोपावरुन यावेळी खडाजंगी झाली. अपयशी उद्योगपती अनिल अंबानींना राफेलचं टेंडर का दिलं? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली.
राहुल गांधी यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन 'चौकीदार चोर है' या आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. मोदी सरकार राफेल मुद्द्याची जेपीसी चौकशी का करत नाही? माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये कोणत्या फाईल्स आहेत? मोदींचं कोणतं गुपित त्यांच्याकडे दडलं आहे? सरकार सत्य दाबण्याचा जितका प्रयत्न करेल, तितकंच ते उसळून येईल, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
दरम्यान, लोकसभेतल्या वादाआधी राफेल वादाचा पहिला अंक थेट गोव्यातून समोर आला होता. गोव्यातील कॅबिनेट बैठकीत पर्रिकर यांनी राफेलवर एक गौप्यस्फोट केल्याचा दावा गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला. राणेंच्या ऑडिओ क्लिपच्या आधारे काँग्रेसने भाजपला घेरलं आणि म्हणूनच पर्रिकर मोदींना ब्लॅकमेल करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मात्र विश्वजीत राणे आणि मनोहर पर्रिकरांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement