(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिद्धू यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने सोनिया, प्रियांका, राहुल गांधी नाराज; पंजाब काँग्रेसला मिळू शकतो नवा प्रदेशाध्यक्ष
सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू यांच्या जागी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण असतील, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, पण पक्ष नेतृत्वापुढे 3-4 नावांचे पर्याय आहेत.
नवी दिल्ली : `पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पंजाब काँग्रेसला लवकरच नवा अध्यक्ष मिळू शकतो. एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अचानक राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे नेतृत्व नवज्योतसिंग सिद्धू यांच्या जागी दुसऱ्या कोणालातरी प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या तयारीत आहे. सिद्धू यांच्या तकडाफडकी निर्णयामुळे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी खूप नाराज आहेत, अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी अचानक आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे पाठवला तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की नेतृत्व त्यांच्या निर्णय मान्य करेल. काँग्रेसच्या सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या या निर्णयामुळे पक्ष नेतृत्व खूप नाराज आहे आणि त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हेच कारण आहे की केंद्रीय नेतृत्वातील कुणीही सिद्धू यांच्याशी संपर्क साधत नाही.
सूत्रांनुसार, सिद्धू यांच्या जागी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण असतील, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, पण पक्ष नेतृत्वापुढे 3-4 नावांचे पर्याय आहेत. मात्र, काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी पक्ष थोडा वेळ थांबू शकतो. सूत्रांनी सांगितले की, चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवताना, त्यांना आवश्यक नियुक्त्यांसाठी मोकळा हात देण्यात आला.
Navjot Singh Sidhu Resign: प्रदेशाध्यक्षपद सोडलं तरीही काँग्रेसमध्येच राहणार : नवज्योत सिंग सिद्धू
पक्षआतापर्यंत चन्नी यांच्यावर खुश आहे आणि पक्षाला मिळालेल्या अभिप्रायानुसार लोकही चन्नी यांच्याबद्दल उत्साही आहेत. अशा परिस्थितीत सिद्धू यांच्या एका निर्णयामुळे पक्ष नेतृत्व बऱ्यापैकी नाराज आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यामागचे खरे कारण सुखजिंदर रंधावा यांना गृहमंत्रिपद देणे आहे. सिद्धू यांना रंधावा यांना गृहमंत्रिपद द्यावे असे वाटत नव्हते. पण पक्षाने सुखजिंदर रंधावा यांना ही विभाग दिला कारण ते एक चांगले प्रशासक आहेत.