एक्स्प्लोर
Advertisement
मोदींच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी देशभरात धाडसत्र, पोलिसांच्या हाती पत्र
पुणे पोलिसांची देशभरातली कालची कारवाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाखाली केल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.
मुंबई : देशभरात विविध ठिकाणी कथित नक्षलसमर्थनाच्या आरोपाखाली पुणे पोलिसांचं धाडसत्र सुरु आहे. पुणे पोलिसांची देशभरातली कालची कारवाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाखाली केल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.
यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन यांच्या घरातून पोलिसांच्या हाती एक पत्र लागलं होतं. या पत्रात मोदींना संपवण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती करण्याचा उल्लेखही आहे.
शिवाय चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं M4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन या पत्रात आहे. त्यासाठी आठ कोटींची गरज असल्याचं म्हटलंय. पत्रातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांकडून देशभरात काल 9 ठिकाणी चौकशी करण्यात आली, त्यातील 5 ठिकाणांहून 5 जणांना अटक करण्यात आली.
पुणे पोलिसांनी देशभरातून नक्षल्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन पाच जणांना अटक केली. प्रसिद्ध कवी वरवर राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्साल्वीस, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज यांचा अटक केलेल्यांत समावेश आहे.
यातील सुधा भारद्वाज यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात हजर केलं असता त्यांना 30 ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. तर इतर चौघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची आणि दिल्लीत काल पुणे पोलिसांच्या पथकांनी छापे मारले. यातून काही महत्वाची कागदपत्र, पुस्तके, पत्रं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं.
31 डिसेंबर 2017 ला पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. या परिषदेला नक्षलवाद्यांनी आर्थिक मदत केली असल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात याआधीही आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
नालासोपारा स्फोटकप्रकरण : आरोपींकडून सनबर्नमध्ये घातपाताचा कट : एटीएस
एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनप्रकरणी पाच जणांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement