एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Not Specified
बुलडाणा : जम्मू काश्मिरमधल्या पुलवामात सीआरपीएफ जवानांवर काल सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 37 जवान शहीद झाले असून यामध्ये बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांचा समावेश आहे.
मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले. सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 37 जवान शहीद झाले असून पाच जवान जखमी आहेत.
दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
संबंधित बातम्या :
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी
हल्ल्यावेळी चूक कुठे झाली, शोधून काढायला हवे, सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड निंभोरकरांचे मत
शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा
Pulwama terror attack : आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ, गौतम गंभीरचा संताप
Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!
भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन
Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
Pulwama terror attack : दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालक भागवतांची मागणी
Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement