Prophet Muhammad Row : अजित डोभाल यांच्याशी संबंधित वक्तव्य इराणकडून मागे
Prophet Muhammad Row : इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्ला बुधवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा केली होती.
Prophet Muhammad Row : प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत भाजपच्या नवीन कुमार जिंदाल आणि नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून देश आणि विदेशात देखील खळबळ उडाली आहे. नवीन कुमार जिंदाल आणि नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. त्यातच आता इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval ) यांच्या भेटीदरम्यान झालेल्या संभाषणावरून चर्चा सुरू झाली आहे. डोभाल यांच्यासंदर्भात इरानने वेबसाइटवर जारी केलेले वक्तव्य इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढून टाकले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत माहिती दिली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्ला बुधवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत व्यापार, दहशतवादासाह अनेक विषयांवर चर्चा केली.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमीर अब्दुल्ला आणि डोवाल यांच्यातील संभाषणाच्या संदर्भात एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात म्हटले होते की, "भारतातील काही लोकांकडून प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा चर्चेदरम्यान उल्लेख करण्यात आला होता. यासोबतच डोवाल यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना आश्वासन दिले की, या प्रकणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल"
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपले हे निवदेन मागे घेतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. "ज्या वक्तव्याचा उल्लेख केला जात आहे ते वक्तव्य इराणने मागे घेतले आहे, अशी माहिती बागची यांनी दिली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले होते की, " डोभाल यांच्यासोबत झालेल्या संभाषणादरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. या संवादादरम्यान काय घडले याचाही खुलासा करण्यात आला आहे. अजित डोवाल यांच्यासंदर्भातील वक्तव्य इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले होते.