(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prophet Muhammad Controversy : प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानावर इस्लामिक स्टेटची भारताला धमकी, व्हिडिओ जारी
Prophet Muhammad Controversy : नुपूर शर्माने दिलेल्या वक्तव्याबाबत अनेक व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. याशिवाय निदर्शने आणि प्रशासनाच्या बुलडोझर कारवाईचे दृश्यही बुलेटिनमध्ये दाखवण्यात आले आहे.
Prophet Muhammad Controversy : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी अलीकडेच पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उसळला. त्याचबरोबर या वक्तव्याबाबत मुस्लिम देशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आतापर्यंत अनेक आखाती देशांनी या टिप्पण्यांबाबत भारताकडे अधिकृतपणे निषेध नोंदवला आहे. कुवेत, कतार आणि इराणने या वादग्रस्त विधानांबाबत भारतीय राजदूतांना बोलावले. त्याचवेळी, आखाती देशांनी या टिप्पण्यांचा निषेध करत तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.
इस्लामिक स्टेटची भारताला धमकी
आता इस्लामिक स्टेटनेही एक न्यूज बुलेटिन जारी केल्याची माहिती समोर आली आहे. या बुलेटिनमध्ये इस्लामिक स्टेटने भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताने (ISKP) आपले मुखपत्र अल अजम फाऊंडेशनद्वारे न्यूज बुलेटिन सुरू केले आहे. या बुलेटिनमध्ये नुपूर शर्माने दिलेल्या वक्तव्याबाबत अनेक व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. याशिवाय निदर्शने आणि प्रशासनाच्या बुलडोझर कारवाईचे दृश्यही या बुलेटिनमध्ये दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओ जारी
द खोरासान डायरीने ट्विट केले की, 'इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताने आपल्या फाउंडेशनद्वारे एक न्यूज बुलेटिन तयार केले आहे. ज्यामध्ये दाखवलेली पहिली बातमी भारत आणि ईशनिंदा यावर लक्ष्य करण्यात आलं आहे. त्या बुलेटिनमध्ये अनेक व्हिडिओ समाविष्ट करण्यात आल्याचे याच ट्विटमध्ये सांगण्यात आले.
बुलेटिनच्या शेवटी भारतावर हल्ला करणार असल्याचा संदेश
द खोरासान डायरीने ट्विट केले की, 'इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताने आपल्या फाउंडेशनद्वारे एक न्यूज बुलेटिन तयार केले आहे ज्यामध्ये दाखवलेली पहिली बातमी भारत आणि ईशनिंदा यावर केंद्रित आहे. त्या बुलेटिनमध्ये अनेक व्हिडिओ समाविष्ट करण्यात आल्याचे याच ट्विटमध्ये सांगण्यात आले. अफगाणिस्तानातील शिखांवर झालेला हल्लाही बुलेटिनमध्ये दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर बुलेटिनच्या शेवटी तो लवकरच भारतावर हल्ला करणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे. ISKP ने यापूर्वी 55 पानांचे एक पत्रक प्रकाशित केले होते, ज्यामध्ये त्यांनी भारतातील मुस्लिमांना त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास सांगितले होते. या बुलेटिनपूर्वी अल-कायदाने पैगंबर मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा बदला घेण्याचेही सांगितले होते. भारतातील अनेक शहरांवर हल्ला करणार असल्याची धमकी त्याने भारताला दिली होती.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात बंगालमध्ये तीन दिवसांपासून निदर्शने
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबाबत देशात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. यावरून बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे, बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये संतप्त आंदोलक नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याला अटक करण्याची मागणी करत आहेत.