Narayan Rane : आत्मनिर्भर भारतासाठी आरोग्य क्षेत्रात निर्यातीला प्रोत्साहन, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून पुरवठा साखळी : नारायण राणे
Narayan Rane : भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय भविष्यासाठी लवचिक जागतिक पुरवठा साखळी तयार करत असल्याचे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
Narayan Rane : भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आणि सर्व बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय भविष्यासाठी लवचिक जागतिक पुरवठा साखळी तयार करत असल्याचे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan rane) यांनी व्यक्त केले. आत्मनिर्भर भारत आणि निर्यात प्रोत्साहन साध्य करण्यासाठी एमएसएमईच्या प्रगत उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातीला पर्याय आणि रचनात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य (health sector) हे लक्ष्य क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आल्याचे राणे म्हणाले. नवी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात राणे बोलत होते.
Health sector : आरोग्य क्षेत्रात निर्यातीला प्रोत्साहन
मंत्रालयाने आयातीला पर्याय शोधण्यासाठी आरोग्य हे लक्ष्य क्षेत्र म्हणून निश्चित केले आहे. आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एमएसएमई क्षेत्रातील प्रगत उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी रचनात्मक उपाययोजनांसाठी आयएचडी अर्थात भारत आरोग्य संवाद सोबत भागीदारी करत असल्याचे राणे म्हणाले. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी नवी दिल्ली येथे इंडिया हेल्थ डायलॉग प्लॅटफॉर्मचा (भारत आरोग्य संवाद मंच )प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्यविषयक उद्योगातील प्रमुख तज्ज्ञ आणि उद्योग अग्रणी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताचे भविष्य घडवणार
संपूर्ण देश आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करत असून आहे. आगामी काळात तंत्रज्ञान आणि नवकल्पना भारतातील आरोग्याच्या प्रत्येक पैलूत बदल घडवून आणतील, असे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताचे भविष्य घडवणार आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच आरोग्य आणि आरोग्य सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला उत्पादन केंद्र बनवण्यासाठी प्रगत उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यात एमएसएमई मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
इंडिया हेल्थ डायलॉग - एक सहयोगी आणि हितधारक मंच आहे. हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) , इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने इंडिया चेंबर ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचा जागतिक उपक्रम आहे. भविष्यासाठी आरोग्य आणि आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी परिसंस्था निर्माण करण्याकरता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे पाठबळ या उपक्रमाला आहे.