Priyanks Gandhi UP Visit: योगी सरकारच्या हेलिकॉप्टरमधून प्रियंका गांधींवर पुष्पवृष्टी, संगमावर केलं पवित्र स्नान
ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होत होता, त्यावेळी प्रियंका आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले लोक बोटीवरुन हेलिकॉप्टर पहात होते.
![Priyanks Gandhi UP Visit: योगी सरकारच्या हेलिकॉप्टरमधून प्रियंका गांधींवर पुष्पवृष्टी, संगमावर केलं पवित्र स्नान Priyanka Gandhi Sangam UP Visit Yogi Adityanath Sarkar helicopter showers flowers Priyanks Gandhi UP Visit: योगी सरकारच्या हेलिकॉप्टरमधून प्रियंका गांधींवर पुष्पवृष्टी, संगमावर केलं पवित्र स्नान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11210640/Priyanka-gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रयागराज : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज प्रयागराजच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या प्रवासादरम्यान, दुपारी त्या अरेल घाटावरुन संगमात पवित्र स्नान करण्यासाठी रवाना झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी मिराया आणि इतर काही लोक होते. प्रियंका गांधी बोटीवरुन संगमला जात असताना, योगी सरकार त्यावेळी हेलिकॉप्टरमार्गे माघ जत्रेत उपस्थित यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव करीत होते. प्रियंका गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांवरही या फुलांचा वर्षाव झाला.
फुलांचा हा पाऊस केवळ एकट्या प्रियंकासाठीच नाही तर आज मौनी अमावस्यानिमित्त माघ जत्रेत आलेल्या लाखो भाविकांसाठी करण्यात आला आहे. ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होत होता, त्यावेळी प्रियंका आणि तिच्याबरोबर उपस्थित असलेले लोक हेलिकॉप्टरला बोटीवर बसून पहात होते.
धर्मनगरी प्रयागराज में मौनी अमावस्या के पावन अवसर पर आज कल्पवासियों एवं श्रद्धालुओं पर पुष्पवर्षा सनातन संस्कृति व आस्था को नमन है। यहां सभी श्रद्धालुओं की सुविधा एवं सुरक्षा के समुचित प्रबंध किए गए हैं। पवित्र संगम में आस्था की डुबकी सभी के लिए मंगलमय हो।#यूपी_में_पुष्प_वर्षा pic.twitter.com/tT8O1BVmb4
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 11, 2021
उत्तर प्रदेशात मौनी अमावस्यानिमित्त श्रद्धाळू पवित्र स्नान करत आहेत. गुरुवारी सकाळपासूनच पवित्र नद्यांच्या काठावर भाविकांची गर्दी वाढली आहे. संगम शहर प्रयागराज असो, बाबा विश्वनाथ यांची नगरी काशी किंवा भगवान श्री रामांची अयोध्या असो, सर्वत्र भक्त मोठ्या संख्येने पोहोचून स्नानासोबत दान करत आहेत. मौनी अमावस्यानिमित्त राज्य सरकारने प्रयागराजमधील संगमसमवेत माघ मेळा साइटवर हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर पुष्पवृष्टी केली आहे. गुरुवारी, लोक मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील नद्यांच्या काठावरील घाटांवर पवित्र स्नान करीत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्थान केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)